अमेरिकेतील भारताच्या वाणिज्यदूतावासातील उप-उच्चायुक्त डॉ. देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा घोटाळा आणि आर्थिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाली होती.
न्यूयॉर्क – माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आणि अमेरिकेतील भारताच्या वाणिज्यदूतावासातील उप-उच्चायुक्त डॉ. देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा घोटाळा आणि आर्थिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाली होती. मात्र दोन लाख ५० हजार डॉलर्सच्या जामिनावर त्यांची सुटका झाली.
देवयानी खोब्रागडे यांच्यावर घरकामासाठी आणलेल्या भारतीयाचे आर्थिक शोषण केल्याचा आणि व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. देवयानी खोब्रागडे यांनी घरकामासाठी भारतीयाला अमेरिकेत आणताना परराष्ट्र मंत्रालयाला चुकीची माहिती देऊन व्हिसा नियमांचे उल्लंघन केले तसेच घरगड्याला नियमापेक्षा कमी वेतन देऊन त्याचे आर्थिक शोषण केले.
अमेरिकेत नोकरांच्या वेतनाचेही काही नियम आहेत. परदेशी नागरिकांना अमेरिकेत घरकामासाठी आणले तरी त्यांनाही तेच नियम लागू होतात. ठरवून दिलेल्या मर्यादेपक्षा कमी वेतन दिले तर ते आर्थिक शोषण समजून संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल केला जातो.
देवयानी खोब्रागडे यांच्याकडे सध्या वाणिज्यदूतावासात राजकीय, आर्थिक, व्यावसायिक आणि महिला कल्याणाची जबाबदारी आहे. देवयानी दोषी आढळल्या तर, त्यांना जास्तीत जास्त दहा आणि किमान पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. देवयानी खोब्रागडे यांनी अमेरिकेत येण्याआधी अन्य देशातील दूतावासात महत्वाच्या पदांवरील जबाबदारी संभाळली आहे.
mothe tevadhe khot. chooorrrrrr