कोकण रेल्वे मार्गावरील मंगला एक्स्प्रेसमध्ये दोन अज्ञातांनी तीन प्रवाशांना चहामधून गुंगीचे औषध देवून लाखो रुपयांचे दागिने लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
चिपळूण- कोकण रेल्वे मार्गावरील मंगला एक्स्प्रेसमध्ये दोन अज्ञातांनी तीन प्रवाशांना चहामधून गुंगीचे औषध देवून लाखो रुपयांचे दागिने लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तिघांना रेल्वे पोलीस आणि वैद्यकीय पथकाने लाईफकेअर दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तामीळनाडू – कोईम्बतूर येथील एस. बालकृष्णा वायलपन्ना (५९), जयश्री वायलपन्ना (४९), लिली कालरा (४५) असे तिघेजण मंगला एक्स्प्रेसमधून केरळला निघाले होते. यावेळी पनवेल येथे तिकीट तपासणीस गाडीत चढले असता पनवेल ते खेड दरम्यान तिकीटे तपासणी करताना ते तिघे बेशुध्दावस्थेत सापडले.
यानंतर चिपळूण रेल्वे पोलिस आणि वैद्यकीय पथकासह रेल्वे पोलिस निरीक्षक डी. तिवारी, दीपक पवार चिपळूण रेल्वे स्थानकावर दाखल झाले. रेल्वेस्थानकात गाडी थांबल्यानंतर त्यांना बेशुध्दावस्थेतच चिपळुणातील लाईफकेअर दवाखान्यात हलवण्यात आले. उपचारानंतर एक प्रवासी शुद्धीवर आल्यानंतर त्याने माहिती दिली की, आंम्हाला खेडच्या अलिकडे दोघांनी चहा दिला. तो चहा प्यायल्यानंतर आम्ही बेशुध्द पडलो. आता शुध्दीवर आल्यानंतर आमच्या अंगावरील दागिने चोरीस गेल्याचे माझ्या लक्षात आले. सोन्याच्या अंगठ्या, पाटल्या, सोनसाखळी असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
फोकट का चाई पीएगा तो ऐसाही होगा .!!!