घरात मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या लग्नाची तयारी केली जाते. तिच्या सासरबद्दलची स्वप्न मनात बाळगली जातात. काळ कितीही पुढे गेला आणि समाज कितीही बदलला तरी लग्नानंतर मुलगी माहेरचा उंबरा ओलांडून सासरच्या उंब-यावरचं माप ओलांडणार ही परंपरा कायमच आहे.
घरात मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या लग्नाची तयारी केली जाते. तिच्या सासरबद्दलची स्वप्न मनात बाळगली जातात. काळ कितीही पुढे गेला आणि समाज कितीही बदलला तरी लग्नानंतर मुलगी माहेरचा उंबरा ओलांडून सासरच्या उंब-यावरचं माप ओलांडणार ही परंपरा कायमच आहे. लहानपणापासून लाडात वाढवलेल्या, जिच्या चेह-यावर हसू येण्यासाठी तिचे सगळे हट्ट पुरवलेल्या लाडक्या लेकीला असं एका क्षणात दुस-यावर सोपवणं हे तसं सोपं नाही. जर लहानपणापासून मुलीला ती म्हणेल त्या सगळ्या गोष्टी चुटकीसरशी घरातच आणून दिल्या तर मग नवरापण का नको, असाच विचार आहे वीणा प्रधानचा आणि म्हणूनच तिला आपल्या लाडक्या प्रांजलसाठी नवरा हवाय तो घरजावई म्हणून. महाराष्ट्राची महावाहिनी असलेल्या ‘झी मराठी’वर वीणा प्रधानच्या अजब इच्छेची ही कथा बघायला मिळणार आहे ‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकेमधून. येत्या ३ मार्चपासून दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. ही मालिका बघायला मिळणार आहे.
‘जावई विकत घेणे आहे’ची कथा आहे प्रधान आणि चिटणवीस कुटुंबाची. उल्हास प्रधान आणि वीणा प्रधान यांची मुलगी प्रांजल असं हे छोटंसं आणि श्रीमंत कुटुंब. भरपूर पैसाअडका, दिमतीला नोकरचाकर, मोठं घरदार आणि गाडय़ाघोडय़ांनी संपन्न असं हे कुटुंब. उल्हास प्रधान हे मस्तमौला स्वभावाचं व्यक्तिमत्त्व त्या उलट वीणा प्रधान तेवढीच कडक शिस्तीची. आई म्हणून प्रांजलला जपणारी त्याप्रमाणेच स्वत:च्या इमेजलाही जपणारी. जगात कोणतीही गोष्ट पैशाने विकत घेता येते अगदी माणसंही, असा समज असणारी आणि त्यामुळेच माणसापेक्षा पैशाला महत्त्व देणारी. तर दुसरीकडे प्रांजल याच्या एकदम विरुद्ध स्वभावाची. प्रांजलला माणसं, नाती जपायला आवडतात, आयुष्यातील छोटय़ा-छोटय़ा गोष्टीत आनंद शोधायला तिला आवडतं आणि तिच्या अपेक्षाही तशाच आहेत, छोटय़ा गोष्टीतून मोठा आनंद देणा-या. पण घरात आईचा शब्द अंतिम त्यामुळे आईच्या विरोधात न बोलणारी पण आईच्या अतिकाळजीपणाला कंटाळलेल्या प्रांजलच्या मनात स्वत:च्या जोडीदाराविषयी, सासरविषयी काही स्वप्नं आहेत. लग्नानंतर आपण सासरी जावं, संसार करावा, नवी माणसं, नवी नाती जपावी अशी स्वप्नं ती मनात बाळगून आहे. पण आईच्या मनात मात्र तिला सासरी पाठवण्याऐवजी जावयालाच घरात आणण्याची योजना आहे. दुसरीकडे आहे चिटणवीस कुटुंब.
कािलदी आणि माधव चिटणविसांचा मोठा मुलगा माधव, मुलगी मनवा आणि सर्वाचा लाडका राया सोबत मंग्या काका आणि आजी- आजोबा असं हे मोठं कुटुंब. कॉलेजचं शिक्षण संपवून राया आता स्वत:चा व्यवसाय किंवा एखादी चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक छोटय़ा-छोटय़ा गोष्टीचा आणि पैशाचा हिशेब ठेवणारे कंजूष वडील, उत्तम जेवण बनवणारी सुगरण आणि प्रेमळ आई, मोठा म्हणून घरातील जबाबदा-या सांभाळणारा टिपिकल मोठा भाऊ, अभ्यासू बहीण आणि लग्न न झालेला एक मंग्या काका, एकमेकांशी भांडणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे गोंडस आजी-आजोबा आणि या सर्वासोबत मनमोकळेपणानं जगणारा राया. या रायाला कायम एक स्वप्न पडत असतं ज्यात तो एका घराच्या उंब-यावरचं माप ओलांडतोय आणि त्यामध्ये इतर चेहरे धुसर असले तरी त्याच्या नवरीचा चेहरा मात्र त्याला स्पष्ट दिसत असतो. या स्वप्नामुळे नेहमीच गोंधळात पडणारा राया सतत त्या मुलीच्या शोधात असतो. ही मुलगी मिळाल्यानंतर आपल्या या स्वप्नातील अर्थ उलगडेल आणि कदाचित तीच आपली जीवनसाथीही असेल या उद्देशाने राया या चेह-याचा शोध घेतोय.
रायाला ही मुलगी मिळेल का, रायाच्या या स्वप्नाचा अर्थ काय असेल, प्रांजलच त्याच्या स्वप्नातली मुलगी असेल तर राया वीणा प्रधानच्या कल्पनेतला जावई असेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळतील ‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकेमधून. सचिन गोखले यांचे दिग्दर्शन आणि राकेश सारंग आणि संगीता सारंग यांच्या ‘कॅम्स क्लब’ची निर्मिती असलेल्या या मालिकेत रायाच्या भूमिकेत निरंजन कुलकर्णी तर प्रांजलच्या भूमिकेत तन्वी पालव ही नवी जोडी बघायला मिळणार आहे. याशिवाय वीणा प्रधानच्या भूमिकेत सविता प्रभुणे दिसणार आहेत. आजवर प्रेमळ आई किंवा सासूची भूमिका करणा-या सविता प्रभुणे पहिल्यांदाच अशी वेगळी भूमिका साकारणार आहेत. इतर भूमिकांमध्ये मिलिंद फाटक, स्नेहा रायकर, संकेत तटकरे, कांचन गुप्ते, सचिन देशपांडे, नूपुर दैठणकर, सी. के. परूळकर, स्नेहा पंत, उमेश दामले, पूजा तावडे, आदी कलाकार बघायला मिळणार आहेत.
You’ve really helped me unatesrdnd the issues. Thanks.