जपानमधील साकारी मोमोई यांची जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती अशी गिनीज बुकात नोंद झाली आहे.
टोकियो – जपानमधील साकारी मोमोई यांची जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती अशी गिनीज बुकात नोंद झाली आहे. मोमोई हे १११ वर्षांचे आहेत. बुधवारी झालेल्या कार्यक्रमात मोमोई यांना गिनीज बुकाचे प्रमाणपत्र देण्यात आले. गिनीज बुकात नोंद झाल्यावर कसे वाटते असे विचारले असता त्यांनी आपल्याला आणखी काही वर्षे जगायचे आहे असे सांगितले.
पाच फेब्रुवारी १९०३ मध्ये मोमोई यांचा जन्म झाला. दुस-या महायुद्धानंतर उत्तर टोकियोमधील सैतामा या शहरात स्थिरावले. त्यानंतर तेथील हायस्कूलमध्ये ते प्राध्यापकपदी कार्यरत होते. मोमोई यांना पाच मुले आहेत. पुस्तके वाचणे खासकरुन चीनी भाषेतील कविता वाचणे हा त्यांचा छंद आहे.
याआधी सर्वात वयोवृद्ध म्हणून गिनीज बुकात नोंद झालेल्या न्यू यॉर्कमधील अलेक्झांडर यॉर्क यांचे जूनमध्ये निधन झाले. ते १११ वर्षे १६४ दिवसांचे होते.
जियो मेरे लाल ! ओर हजारो साल !!