दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा व जमीन लाटल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असणारे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलवले आहे.
मुंबई- दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा व जमीन लाटल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असणारे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलवले आहे.
गुरुवारी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे त्यांच्यावर काही महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येणार होत्या. मात्र, भुजबळांवर नेमक्या कोणत्या-कोणत्या चाचण्या झाल्या आणि त्यांची प्रकृती कशी आहे? यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाद्वारे कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.
सप्टेंबरमध्ये ताप आल्यामुळे भुजबळ यांना तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. ताप येत-जात असल्याने डेंग्यू झाला असेल, अशी प्राथमिक शक्यता होती. पण त्यांना व्हायरल फिव्हर होता. यावेळी त्यांच्या सांध्यांना सूज आली होती. उपचारादरम्यान भुजबळांच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते.
गेले २५ दिवस भुजबळ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने १२ ऑक्टोबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांची पुन्हा तुरुंगातरवानगी करण्यात आली.
मात्र, १५ दिवसात तुरुंगात भुजबळ यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने मागील आठवडय़ात त्यांना पुन्हा जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासण्या केल्या असता त्यांना गॅस झाल्याचे निदान झाले.
मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्यावरही त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होते. त्यामुळे त्यांची ‘हॉल्टर मॅनेटरिंग टेस्ट’ करण्यात आली. २४ तास ही तपासणी सुरू होती. पण, तरीही भुजबळ यांच्या प्रकृतीत तिळमात्रही सुधारणा दिसून येत नाही.
रुग्णालयातील सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये भुजबळ यांना जे.जे.रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्यावर ‘थॅलियम सीटी स्कॅन’, ‘इलेक्ट्रो फिजिलॉजी स्टडी’ आणि ‘ईसीजी’ या तीन तपासण्या करायच्या होत्या. पण जे.जे.रुग्णालयात या तपासण्या होत नसल्याने खासगी रुग्णालयातून या चाचण्या करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाला लेखी पत्र पाठवले होते.
मात्र, त्यावेळी या चाचण्या झाल्या नव्हता. त्यामुळे भुजबळ यांना पुन्हा त्रास सुरू झाल्याने आता खासगी रुग्णालयातून या चाचणी करण्यात येत आहे. या सर्व चाचण्यांचे अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. परंतु, या चाचण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती उघड करण्यात येत नसल्याने नेमक्या कोणत्या चाचण्या भुजबळांवर करण्यात आल्या हे सांगण कठिण होत आहे.
aho thodefar paise ikde tikde karoon ek adhyavat latest hospital jar sahebaani baandhle aste tar aaj tyacnchevar ashi paali nasti.