मोबाईलच्या विश्वात चीननेही आपला चांगल्या फिचर्ससहीत कमी किंमतीचा स्मार्टफोन स्पर्धेसाठी दाखल केला आहे.
नवी दिल्ली- मोबाईलच्या विश्वात चीननेही आपला चांगल्या फिचर्ससहीत कमी किंमतीचा स्मार्टफोन स्पर्धेसाठी दाखल केला आहे. कुलपॅड मोबाईल कंपनीचा ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा स्मार्टफोन भारतात दाखल केला आहे. या स्मार्टफोनची किंमत सहा हजार ९९९ रुपये आहे.
कमी किमतीत चांगले फिचर्स देणारा हा स्मार्टफोन मोबाईलप्रेमींच्या पसंतीस उतरणारा आहे. ‘कूलपॅड नोट ३ लाइट’ हा स्मार्टफोन अँमेझोन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. शुक्रवार संध्याकाळी पाच नंतर या स्मार्टफोनचे रजिस्ट्रेशन सुरू होईल.
‘कूलपॅड नोट ३ लाइट’ स्मार्टफोनचे फिचर्स
» ५.० इंच डिस्प्ले
» ५.१ अँड्रॉईड लॉलिपॉप
» ७२० x १२८० पिक्सल रेझोल्यूशन
» एक गिगाहर्टझ क्वाडाकोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
» तीन जीबी रॅम
» १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
» पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» १६ जीबीची इंटरनल मेमरी
» २५०० एमएएच बॅटरी
» किंमत सहा हजार ९९९ रुपये.
भारताची लोक संख्या १२५ कोटी +जगातील १२५ कोटी लोकांनी बनवलेल्या वस्तू भारतीय खरेधि करतात.म्हणून भारत देश २५० कोटी lokanchya खाण्या पिण्याची सोय करीत आहे. he कोणाला माहित आहे.