कोकण मर्कंटाइल को-ऑप बँकेच्या संगमेश्वर शाखेमधील कर्जदारांनी खोटे सोने ठेवून २ कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.
देवरूख- कोकण मर्कंटाइल को-ऑप बँकेच्या संगमेश्वर शाखेमधील कर्जदारांनी खोटे सोने ठेवून २ कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात संगमेश्वर, खेड तालुक्यातील ३९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अकबर युसूफ कोंडकरी (४७, रा. मुंबई शाखेचे उपमहाव्यवस्थापक) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ मे २०१२ ते १९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत घडला. सोनेतारण कर्ज योजनेच्या माध्यमातून ३९ जणांनी आपल्याकडील सोन्याचे दागिने संगमेश्वर शाखेमध्ये गहाण ठेवले होते. दागिने बनावट असल्याची माहिती असतानाही आरोपींनी संगनमताने फसवणूक केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
कारभारात सुसूत्रता यावी, या उद्देशाने मुंबई शाखेने सोने तपासण्याचे मशिन खरेदी केले आहे. हे मशिन संगमेश्वर शाखा येथे आणून शाखेमध्ये असलेल्या सोन्याची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी सोने तारण कर्ज योजनेतील सोने हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
कोंडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३९ जणांवर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुचित्रा महाडिक, रहिसा नायकोडी, हफिजा नायकोडी, हिदायत दळवी, हरीफा सय्यद (सर्व रा. कसबा), विनोद कुळये, आफताब शहा, आसमा शेख (कसबा), नौशाद खान (कोंडय़े), शौकत अलवारे, अली मेमम (पेठमाप), मेताज तांबे (मालदोली), अझरा बोदले (देवरूख), अतीसा काझी (कळंबस्ते), फरमान महाडिक, खतीजा बेबल (कसबा), मरियांबी फिलवान (कोंडिवरे), फरजाना तांबे (नायरी), रजीया गुलाम जियानी कुरेशी (माखजन), मोहनलाल रजापती, सुलेमान खान (कोंडिवरे), यासीम नाईक, बिल्कीश कालसेकर (कोंडिवरे), दिनार दिलीप पवार, सतीश गमरे (खेड), इक्बाल मुल्लाजी (कळंबस्ते), जहीर कोलथरकर (कोंडय़े), नसीमा नाईक (कसबा), राजेश महाडिक, जहीदा आंबेडकर, समुदा केदकर (आंबेड बुद्रुक), नरजहा शहा (दखनी), नसीना मुल्ला (संगमेश्वर), साजीया मुल्ला, फरीमा नाईक (कसबा), प्रमोद सैतवडेकर, उदय सैतवडेकर (संगमेश्वर), तौफीक सादीम (रत्नागिरी), नाजीरखान मापारी मुचरी यांचा समावेश आहे.
हे सोने तारण ठेवताना बँक ऑफिसर डोळ्यांवर झापडे लावून बसले होते काय ?? कदाचित बँक वाल्यानीच हे सोने नकली तयार
केले असेल !??