तरुणांची माथी भडकावून ‘नवनिर्माण’ होत नाही, असा घणाघाती हल्ला ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी रविवारी राज ठाकरे यांच्यावर चढवला.
सोलापूर- ‘‘काही राजकीय नेत्यांनी तरुणांचा वापर करून दुकान चालवले आहे. केवळ भावना भडकावून तरुणांना भुलथापा मारायच्या, हे किती दिवस चालणार. तरुणांची माथी भडकावून ‘नवनिर्माण’ होत नाही,’’ असा घणाघाती हल्ला ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी रविवारी राज ठाकरे यांच्यावर चढवला. ‘ते तरुणांची माथी भडकावत असले, तरी आम्ही बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगार मेळावे घेतो आणि तरुणांना रोजगार देतो,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.
मुंबईत एकाचवेळी २५ हजार तरुणांना रोजगार देऊन ‘गिनीस बूक’मध्ये नोंद झालेल्या ‘स्वाभिमान’ संघटनेच्या वतीने रविवारी सोलापूर येथील होम मैदानावर ‘महारोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याद्वारे तब्बल ६,१२० तरुणांना नोक-या देण्यात आल्या. या मेळाव्यात नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
‘मराठी माणसांचा कळवळा असणारे नेते त्यांना रोजगार का देत नाहीत, नोक-या देण्यासाठी त्यांचे हात बांधले आहेत काय’ असे सवाल करत ‘परप्रांतीयांवर दगड मारण्यापेक्षा रोजगार देऊन दाखवा’ असे आव्हानही त्यांनी राज यांना केले. मुंबईत एकाचवेळी २५ हजार तरुणांना रोजगार देणारी ‘स्वाभिमान’ ही एकमेव संघटना आहे. या संघटनेचा नोकरी देण्याचा विक्रम मोडून दाखवणा-याचा आपण सत्कार करू, असेही राणे यांनी सांगितले. दोन महिन्यांनंतर पुढील रोजगार मेळावा नाशिकमध्ये घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निखिल वागळे यांच्यावर टीका
आमदारांना ‘मवाली’ असे संबोधणा-या राजीव खांडेकर आणि निखिल वागळे यांच्यावर दाखल झालेल्या हक्कभंगाचे नितेश राणे यांनी समर्थन केले. टीआरपी वाढवण्यासाठी या वृत्तवाहिन्या खालच्या स्तराला जात आहे. निखिल वागळे यांना ‘प्रती राखी सावंत’ असे संबोधले तर ते चुकीचे होणार नाही, असेही ते म्हणाले. संजय दत्त यांना शिक्षेत सवलत देण्याच्या मागणीलाही त्यांनी विरोध केला. ‘कोणाला सवलत मिळावी वाटत असेल, तर गेलेल्या जिवांचे काय, घरात शस्त्र ठेवून उद्या कोणीही गांधींजीवर चित्रपट काढेल, मग त्यालाही शिक्षेत सवलत द्यावी का, असा सवाल राणे यांनी केला.
maharashtrat rade karwayche
tarunana nirash karayche
itar prantatun majuri sathi yenarya lokanwar sodayche
udyog adchanit anayche
gujratche gun gayche
marathi rajkarnyana deshachya najret nalayak tharwayche.
HE UDYOG KADHI BARE THAMBAYCHE.