शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार अधिक योग्य उमदेवार असल्याचे मत व्यक्त केले.
पाटणा- भाजपमधील बहुतांश नेत्यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा आहे. मात्र पक्षातंर्गत मोदी विरोधी गट नरेंद्र मोदींच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे. दिवसेंदिवस भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी अधिक तीव्र होऊ लागली आहे.
भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी पंतप्रधानपदासाठी नितीश कुमार अधिक योग्य उमदेवार असल्याचे मत व्यक्त करुन, अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींच्या नावाला विरोध केला. गेल्या आठवडयातही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये पंतप्रधानपदासाठी आपली लालकृष्ण अडवाणींच्या नावाला पसंती असल्याचे मत व्यक्त केले होते.
नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमदेवार आहेत. आज ते देशातील चांगल्या आणि यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. असे सिन्हा जयप्रकाश नारायण विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आपल्या या विधानावरुन वाद होऊ नये यासाठी त्यांनी पंतप्रधानपदासाठी अनेक योग्य पर्याय आहेत त्यापैकी नितीश कुमार एक आहेत असे स्पष्टीकरण दिले.
भविष्यात भाजप आणि जदयू एकत्र येतील असा आशावादाही त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणूक प्रचारप्रमुखपदी निवड झाल्याने जदयूने भाजपबरोबरची सतरा वर्षांपासूनची युती तडकाफडकी तोडून टाकली होती. भाजप आणि जदयूमध्ये आता विळया-भोपळयाचे नाते आहे. असे असताना सिन्हा यांनी नितीश कुमारांची तोंडभरुन कौतुक केल्याने आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
krutaghna sinha naav thevle paahije.