दिल्लीतील जामा मशिदीच्या ‘नायब शाही इमाम‘पदी शाबान बुखारी यांची नेमणूक करण्यात येणार असून या कार्यक्रमाला शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित न करता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले आहे.
नवी दिल्ली- दिल्लीतील जामा मशिदीच्या ‘नायब शाही इमाम‘पदी शाबान बुखारी यांची नेमणूक करण्यात येणार असून या कार्यक्रमाला शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित न करता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले आहे.
दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीच्या शाही इमामपदी २२ नोव्हेंबर रोजी शाबान बुखारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या समारंभाला इमाम सैयद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलेले नाही. मात्र त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रित केले आहे.
बुखारी यांच्यानंतर वारसा चालविण्यासाठी त्यांचा १९ वर्षांचा मुलगा शाबान बुखारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची नियुक्ती ‘नायब शाही इमाम‘ म्हणून करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला मोदींना निमंत्रण दिलेले नाही. मात्र केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, राजनाथ सिंह या भाजप नेत्यांना निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील सुमारे एक हजार धार्मिक नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे.
मोदी कसेही असोत, ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्या पदाचा तरी मान ठेवायला हवा होता. त्यांना डावलून पाकिस्तानच्या पंतप्रधानाला बोलावणे, हा देशद्रोह आहे.