बॉलिवुड अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण प्रिती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. नेस वाडिया प्रिती झिंटाचा माजी प्रियकर आहे.
मुंबई – बॉलिवुड अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण प्रिती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. नेस वाडिया प्रिती झिंटाचा माजी प्रियकर आहे.
३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरु असताना, नेस वाडियाने आपल्याशी छेडछाड केल्याचा आरोप प्रितीने केला आहे.
गरवारे पॅव्हेलियनमध्ये मी बसलेली असताना, रात्री नऊच्या सुमारास नेस तेथे आला व त्याने आपल्याला शिवीगाळ सुरु केली. मी त्याला हा प्रकार थांबवायला सांगितला. पणे त्याने ऐकले नाही. अखेर मी तेथून जाण्यासाठी उठले तेव्हा त्याने माझा हात पकडून मला खाली खेचले असे प्रितीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. स्टेडियममध्ये सर्वांसमोर ही घटना घडल्याचे प्रितीने म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे ही घटना घडल्यानंतर बारा दिवसांनी प्रितीने तक्रार केली आहे. गुरुवारी रात्री प्रितीने मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जाऊन नेस विरोधात तक्रार केली. यावेळी तिचा ड्रायव्हरही तिच्यासोबत होता. प्रितीने पोलिसांना नेस वाडिया विरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे.
पोलिसांनी सध्या तक्रार दाखल करुन घेतली असून, पोलिस तपास करत आहे. प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी आणि सबळ पुरावे मिळाल्यानंतरच पोलिस ठोस कारवाईची पावले उचलू शकतात. नेस वाडियाने आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या तक्रारीने आपल्याला धक्का बसल्याचे नेस यांनी म्हटले आहे. नेस आणि प्रिती झिंटामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र २००९ मध्ये त्यांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आले.
आगग,बये ! नेस तुझा प्रियकर होता ना?? मग त्याने छेद छाड केली तर बिगडले कुट्ये????? कशाला उगीच बिचाऱ्याची धिंड काढतेस ,??