वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्या विरोधात मॉडेलवर बलात्कार केल्याचा गुन्हा मालवणी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
मुंबई- वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्या विरोधात मॉडेलवर बलात्कार केल्याचा गुन्हा मालवणी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गोरेगाव येथे राहणा-या ३४ वर्षीय मॉडेलवर मढ येथील थ्री-स्टार हॉटेलमध्ये हा बलात्कार करण्यात आला. पीडित मॉडेलने पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे तक्रार करून पुरावे सादर केले होते. दरम्यान, केंद्रीय गृहखात्याने याबाबतचा अहवाल मागवला आहे.
या प्रकरणी पारसकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी गुन्हे शाखेतील महिला कक्ष पुढील तपास करणार आहे. महाराष्ट्र पोलिस मुख्यालयातील ‘नागरी संरक्षण हक्क विभागा’चे पोलिस उप-महानिरीक्षक पारसकर यांच्या विरोधात मॉडेलने विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला.
पाच महिन्यापूर्वी पारसकर हे मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असताना ही मॉडेल एका तक्रारी निमित्त त्यांना भेटायला गेली होती. पारसकरांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्याने वारंवार भेटी होत होत्या. पारसकर यांनी अनेक वेळा विविध थ्री-स्टार हॉटेलमध्ये बोलावून आपले लैंगिक शोषण केल्याचे मॉडेलने तक्रारीत म्हटले आहे.
त्यानुसार मॉडेलने बुधवारी रात्री मालवणी पोलिसांत पारसकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली. मात्र, याप्रकरणी अद्याप पारसकर यांना अटक करण्यात आलेली नाही. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास महिला गुन्हे कक्ष शाखेच्या पोलिस उपायुक्त शारदा राऊत करीत आहेत, असे उत्तर प्रादेशिक परिमंडळाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त ब्रिजेश सिंग यांनी सांगितले.
हि मोडेलिंग करणारी बया स्वतावर बलात्कार क्रिया घडत असताना तोंडावर चिकट पट्टी लावून मजा घेत होती काय ????? आता कशाला बोम्बल्तेय ????