केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या भविष्यात भारताच्या राष्ट्रपती होतील असे भाकीत इराणी यांच्या ज्योतिषांनी वर्तवले आहे. यापूर्वी इराणी यांना मंत्रिपद मिळेल असे भाकीतही याच ज्योतिषांनी केले होते.
नवी दिल्ली – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या भविष्यात भारताच्या राष्ट्रपती होतील असे भाकीत इराणी यांच्या ज्योतिषांनी वर्तवले आहे. यापूर्वी इराणी यांना मंत्रिपद मिळेल असे भाकीतही याच ज्योतिषांनी केले होते.
स्मृती इराणी रविवारी आपले पती झुबिन इराणी यांना भेटण्यासाठी राजस्थानमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी ज्योतिषी पंडित नथुलाल व्यास यांची भेट घेतली. याआधीही इराणी यांना एनडीए सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रिपद मिळू शकते असे भाकीत व्यास यांनी केले होते. चार तास चाललेल्या या बैठकीत इराणी यांनी खाजगी तसेच राजकीय भवितव्याबाबत व्यास यांना प्रश्न विचारले तसेच त्यांनी केलेले भाकीत खरे ठरल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
या ज्योतिषी भेटीबाबत इराणी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी माझ्या खाजगी आयुष्यात काय करते याच्याशी लोकांचा काही संबंध नाही. मला माहित आहे की टीआरपी मिळवण्यासाठी हे सर्व केले जाते. जर असे करुन तुमच्या संस्थेला पैसै मिळत असतील तर मी खूश आहे. दरम्यान, इराणी यांच्या ज्योतिषी भेटीनंतर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
घंटा