भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे.
नवी दिल्ली – भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे.
चीनच्या ली च्या क्रमवारीत घसरण झाल्याने सायनाला पुन्हा एकदा पहिले स्थान मिळाले आहे. इंडियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर सायनाला पहिले स्थान मिळाले होते. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारी सायना भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू होती.
मात्र मलेशियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेत उपांत्यफेरीत पराभव झाल्यानंतर तिची दुस-या स्थानावरघसरण झाली होती. मागच्या आठवडयात झालेल्या सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतून सायनाने माघार घेतली होती.
ली ने ही या स्पर्धेतून माघार घेतल्याने तिच्या क्रमवारीत दोन स्थानांची घसरण झाली आणि सायनाला पहिले स्थान मिळाले. भारताची दुसरी आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे.
टॉप टेनमधून सिंधू बाहेर झाली असून, तिला बारावे स्थान मिळाले आहे. पुरुषांच्या क्रमवारीत के.श्रीकांत चौथे स्थान कायम राखून आहे.
saina nehwal भारत कि शान !! ब्रावो !!