सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली क्युआन येव यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत.
सिंगापूर – सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली क्युआन येव यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. २३ मार्च ली यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
रविवारी पार पडणा-या अंत्यविधीसाठी मोदी सिंगापूरमध्ये दाखल झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.
मोदींसह यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष पार्क जेयून-हे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो आणि मलेशियन राजे अब्दुल हलिम शाह हे ही उपस्थित राहणार आहेत.
५ फेब्रुवारीपासून ते न्यूमोनियाने आजारी होते. ब्रिटिशांची वसाहत असलेल्या सिंगापूरला जागतिक व्यापार व वित्त क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवून दिला. सिंगापूरला त्यांनी ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले. त्यानंतर जगातील शक्तीशाली राष्ट्र म्हणून त्यांनी सिंगापूरला ओळख मिळवून दिली. सुमारे ३१ वर्षे ते सिंगापूरचे पंतप्रधान होते.
RIP !