किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्सवर मंगळवारी होणारी सातव्या हंगामातील ‘क्वॉलिफायर १’ लढत मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
कोलकाता– किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्सवर मंगळवारी होणारी सातव्या हंगामातील ‘क्वॉलिफायर १’ लढत मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही लढत आता बुधवारी (२८ मे) दुपारी चार वाजता खेळवली जाणार आहे.
मंगळवारी अंपायर नायजेल लाँग आणि एस. रवी यांनी ठराविक अंतराने पावसाचा अंदाज घेतला. मात्र ५.१५ वाजतां केलेल्या पाहणीनंतर सामना पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. पावसाचा व्यत्यय बुधवारीही कायम राहिल्यास कमीत कमी पाच षटकांचा खेळ होण्यासाठी प्रयत्न केले जातील. पाच षटकांचा खेळ न झाल्यास ‘सुपर ओव्हर’चा अवलंब केला जाईल.
पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि ‘सुपर ओव्हर’ही न झाल्यास सर्वाधिक सामने जिंकणारा पंजाब अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. अंतिम फेरी हुकली तरी कोलकाता संघाला ‘क्वॉलिफायर २’ च्या रूपाने आणखी एक संधी आहे.
kings is the final in win
Punjab win final