संगणकावर मराठी वापरण्याची इच्छा असलेल्या वाचकांना इंटरनेटशिवाय मराठीत प्रथमच टायपिंगची सोय करणारी एक ‘स्मार्ट’ भेट संक्रातीनिमित्ताने ‘प्रहार’ देत आहे.
मुंबई- बदलत्या जीवनशैलीनुसार संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी या तंत्रज्ञानाचा मुख्य भर इंग्रजीवर असल्यामुळे संगणकात सर्व भाषांतून आणि सहज वापरासाठी आजही अनेक अडथळे जाणवत असतात. संगणकावर मराठी वापरण्याची इच्छा असलेल्या वाचकांच्या मार्गातील हे अडथळे बहुतांशी दूर करणारी एक ‘स्मार्ट’ भेट आजच्या संक्रातीनिमित्ताने ‘प्रहार’ने आपल्या वाचकांना देऊ केली आहे.
सोपे आणि सहजपणे मराठी टंकलेखन, दोन कळफलक, दोन मराठी युनिकोड फाँट आणि टाइप केलेल्या अक्षरानुसार शब्दपर्याय सुचवणारा (इंटरनेटशिवाय प्रिडिक्टिव टायपिंग मराठीत प्रथमच) मराठी शब्दकोष अंतर्भूत असलेले ‘प्रहार स्मार्ट कीज्’ हे सॉफ्टवेअर मराठी वाचकांसाठी खास विकसित करण्यात आले असून त्याचे लोकार्पण ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज होणार आहे.
या कार्यक्रमास युवा नेते व स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे, ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे, व्यवस्थापक मनीष राणे, ‘स्मार्ट सोल्युशन्स’चे श्रीधर मदुराई आणि श्रीधर म्हैसूर आदी उपस्थित राहणार आहेत. ‘प्रहार स्मार्ट कीज्’मुळे मराठी वाचकांचा युनिकोड फाँट मिळवण्यासाठीचा खटाटोप पूर्णपणे थांबणार आहे.
संगणक आणि इंटरनेटवर मराठीतून लिहिण्याची इच्छा असलेल्यांच्या अडचणींवर ‘प्रहार’ने शोधलेले हे स्मार्ट उत्तर आहे. यामुळे संगणकावरील मराठी टायिपग ही गोष्ट इंग्रजीइतकीच सोपी होणार आहे. ‘प्रहार’ आणि ठाण्यातील ‘स्मार्ट सोल्युशन्स’ने एकत्र येऊन ‘प्रहार स्मार्ट कीज्’ची निर्मिती केली आहे.
‘प्रहार स्मार्ट कीज्’ची वैशिष्टय़े
» युनिकोड सपोर्ट
» टायपिंग करताना प्रिडिक्टिव टायिपगची सुविधा
» मराठी शब्दकोष
» इंग्रजी फोनेटिक आणि इनस्क्रिप्ट की बोर्ड
» दोन मराठी युनिकोड फाँट
» सर्व विंडो ऑपरेटिंग सिस्टीमवर सहजतेने उपयोग शक्य
Very Nice…………….
VERY NICE FOR US TO MARATHI TYPEWRITING.
VERY NICE FOR US TO MARATHI TYPEWRITING