कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्गनगरी ते कसाल या दरम्यान पडवे कटिंग भागात रुळांवर ठेवलेले सुमारे वीस किलो वजनाचे सात दगड शुक्रवारी दुपारी भरधाव राजधानी एक्स्प्रेसने उडवून दिले.
कणकवली- कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्गनगरी ते कसाल या दरम्यान पडवे कटिंग भागात रुळांवर ठेवलेले सुमारे वीस किलो वजनाचे सात दगड शुक्रवारी दुपारी भरधाव राजधानी एक्स्प्रेसने उडवून दिले.
राजधानी एक्स्प्रेसचे होस्टल पाईप तुटल्याने ती जागेवरच थांबली आणि पुढील अनर्थ टळला असला तरी भीषण घातपाताचा हा कट उघडकीस आल्यामुळे कोकण रेल्वेचे प्रशासन हादरले आहे.
केवळ होस्टल पाईप तुटण्यावर निभावल्यामुळे गाडीतील शेकडो प्रवासी बचावले आहेत. रेल्वे प्रशासनाने या घातपाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पडवे कटिंग रेल्वे मार्गाची तपासणी शुक्रवारी दुपारी १.१५ वा दरम्यान रेल्वे कर्मचा-यांनी नेहमीप्रमाणे केली होती. तेव्हा मार्ग मोकळा होता. मात्र दुपारी १.४५ वाजता नवी दिल्लीच्या दिशेने जाणा-या राजधानी एक्स्प्रेसने हे मोठे दगड उडवले. याचाच अर्थ ही एक्स्प्रेस जाण्यापूर्वी काही वेळ आधी अज्ञातांनी हे दगड घातपात करण्याच्या उद्देशाने आणून ठेवल्याचे उघड झाले आहे. हे दगड उडवल्यानंतर पुढे जाऊन थांबलेली गाडी आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.
या घटनेने कोकण रेल्वेचे प्रशासन चांगलेच हादरले आहे. कोकण रेल्वे मार्गावर मोठा घातपात करण्याची वा या एक्स्प्रेसला अपघात करण्याचा हेतूच असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. वर्षभरापूर्वी कुडाळ हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर अशाच रितीने ट्रॅकवर दगड ठेवण्यात आले होते. प्रसंगावधनामुळे त्यावेळी पुढील अनर्थ टळला होता.
अशा समाज कंटाकाना धडा शिकवण्याची गरज आहे …. त्यांना शोधून कठोर शिक्षा केली पाहिजे…