पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वीच न्यूयॉर्कमधील फेडरल न्यायालयाने २००२ च्या गुजरात दंगलीसंदर्भात मोदीं विरोधात समन्स बजावले.
न्यूयॉर्क – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वीच न्यूयॉर्कमधील फेडरल न्यायालयाने २००२ च्या गुजरात दंगलीसंदर्भात मोदीं विरोधात समन्स बजावले. नऊवर्षाच्या व्हिसा बंदीनंतर नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यावर गेले आहेत.
अमेरिकन जस्टीस सेंटर या मानवी हक्क संघटनेने २००२ च्या गुजरात दंगलीसंदर्भात मोदींविरोधात याचिका दाखल केली आहे. गुजरातमध्ये दंगली झाल्या त्यावेळी मोदी राज्याचे मुख्यमंत्री होते.
एटीसीए आणि टीव्हीपीए या कायद्यातंर्गत मोदींना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना २१ दिवसांच्या आत या नोटीसला उत्तर देणे बंधनकारक आहे अशी माहिती अमेरिकन जस्टीस सेंटरचे वकील गुरपतवंत सिंह यांनी दिली.
२८ पानी तक्रारपत्रामध्ये मोदींवर मानवतेविरोधात गुन्हा केल्याचा आरोप करण्यात आला असून, नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. मोदींनी या नोटीशीला उत्तर न दिल्यास निकाल त्यांच्या विरोधात दिला जाईल असे गुरपतवंत सिंह यांनी सांगितले.
गुजरात दंगलीच्या आरोपामुळे अमेरिकेने नऊ वर्ष मोदींचा व्हिसा मंजूर केला नव्हता. मात्र देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दूरध्वनीकरुन मोदींचे अभिनंदन केले आणि अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. मोदींच्या अमेरिका दौ-याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
American justice centre should file case against American president for attacking other countries .