कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांसाठीची नियमावली बाजार नियामक ‘सेबी’ने अधिक कडक केली आहे.
मुंबई – कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांसाठीची नियमावली बाजार नियामक ‘सेबी’ने अधिक कडक केली आहे. या नियमावलीनुसार, या सल्लागारांना भांडवली बाजार नियामकाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.तसेच ज्या प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोडलेल्या सर्व प्रकरणांची माहिती देणे आवश्यक असल्याचे ‘सेबी’ने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. ही नियमावली येत्या तीन महिन्यांमध्ये लागू होणार आहे.
गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सेबीने ही नवी नियमावली तयार केली असून बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) आणि कॉर्पोरेट्स यांनी आपली सल्लागार सेवा वितरणासारख्या इतर व्यवसायापासून अलिप्त ठेवावी लागणार असल्याचे या नियमावलीत म्हटले आहे. तसेच गुंतवणूक सल्लागारांना विशिष्ट उत्पादनांसाठी दिलेल्या सल्ल्यासाठी स्वीकारलेल्या शुल्काची माहिती द्यावी लागणार आहे.
गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी कंपनीसाठी कमीत कमी २५ लाख तर व्यक्तीसाठी एक लाखांच्या भांडवल असणे आवश्यक असल्याचे सेबीने म्हटले आहे. सध्याच्या सल्लागारांना या भांडवल निकषपूर्तीसाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच एखाद्या उत्पादनाचा सल्ला दिल्याच्या तारखेपासून सल्लागाराला त्याच्या खात्यामध्ये कोणताही व्यवहार करता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच ‘नो युअर कस्टमर्स’ (केवायसी), जोखीम प्रोफाइल, उपयुक्तता आलेख, कराराची प्रत, गुंतवणूक सल्ला (तोंडी अथवा लेखी), शुल्काविषयी माहिती आणि सल्ला दिलेल्या वेळेची किमान पाच वर्षापर्यंतची नोंद इलेक्ट्रॉनिक किंवा प्रत्यक्ष फॉर्मच्या स्वरूपात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सर मै किसी कंपनी से (research फर्म) से advice ले के सहारे मार्केट मे ट्रेडिंग करता था. परंतु loss नुकसान हि हुआ. Company कोई shikayat करनी है तो plz बतायें… किसे shikayat करें… क्यूकी उन्होने जो कहा था कि जब तक आपका नुकसान रिकव्हर नही होगा tab tak आपको टेलिफोनिक सपोर्ट करेंगे. अभि कोई फोन भी नही आता और batate है कि msg पे काम करो…