लक्ष्मीपूजन ते भाऊबीज हे तीन दिवस नटण्या-मुरडण्याचे! नखशिखांत परफेक्ट दिसायलाच हवं. पण घराची साफसफाई आणि स्वत:चं कौशल्य पणाला लावत खुसखुशीत फराळ करण्यातच सगळे दिवस निघून गेले. स्वत:कडे लक्ष द्यायला मात्र वेळच मिळाला नाही. दिवाळी अगदी उद्यावर येऊन ठेपली आहे. शेवटच्या क्षणाला पार्लरमध्ये जायचं तर तिथे गर्दीच गर्दी! पण टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. कारण घरच्याघरीदेखील तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणू शकता. त्यासाठी या काही टिप्स
>मसुर डाळीची पावडर, अॅलोवेरा जेल, टोमॅटो प्युरी आणि आलं पेस्ट हे सगळं एकत्र करून १० ते १५ मिनिटं चेह-याला लावून ठेवावं. आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.
>आल्याचा रस काढून चोथा बाजूला काढावा. त्यामध्ये थोडा मध आणि रोझ वॉटर घालून हे मिश्रण १० ते १५ मिनिटं चेह-याला लावावं.
>दोन चमचे ओट्स आणि पाच बदामांची पावडर करून घ्यावी. त्यात एक चमचा मध आणि आवशक्यतेनुसार दही घालून हा पॅक चेह-याला लावावा. तसंच तेलकट त्वचा असेल तर त्यात मध आणि दह्याऐवजी लिंबाचा रस आणि ‘फुलर्स अर्थ’ची पावडर मिक्स करावी.
>ग्लिसरिन आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्यासही त्वचा उजळून निघेल.
>कॅस्टर ऑइल २० मिनिटं लावून ठेवल्यास चांगला फायदा होतो.
>कोरड्या त्वचेसाठी केळ्याचा गर चेह-याला लावाल्यास चेहरा मुलायम होतो.
>घरगुती प्रोडक्ट न वापरता दिवाळीच्या दिवशी चांगला चेहरा हवा असेल तर बाजारात पील ऑफ पॅक विकत मिळतात जे केवळ रोझ वॉटर किंवा पाण्यात मिक्स करून लावता येतात. त्याचादेखील तुम्ही वापर करू शकता.
>या सगळ्याबरोबरच जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा.
>हे फेस पॅक लावण्याबरोबरच तुम्ही थोडं स्क्रब केलंत तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट मिळू शकतो.
>दिवाळीच्या दिवसात आपण आकर्षित कपडे घालतो जे कुंदन, लटकन किंवा जरदोसीने सजवलेले असतात. त्यामुळे ते खुलून दिसतात. पण या सगळ्या ड्रेसेसवर प्रत्येक वेळी खूप मेकअप केलाच पाहिजे असं नाही. साधेपणातही तुम्ही खूप छान दिसू शकता.
mazi skin khup oily asun mazya chehryavar khup pimpals aahet tsech mazi skin khup kalihi vatthe mi kay kru mi khup upay kele dr.chi tritmenthi 6 mhine ghetli aushdhe samplyavar punha pimpals aale pls mla upay suchva pls…