शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा दसरा मेळाव्यात झालेले अपमान नाट्य ताजे असतानाच त्यांना पुन्हा एकदा शिवसेना नेतृत्वाकडून अपमानीत व्हावे लागले आहे.
मुंबई– शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा दसरा मेळाव्यात झालेले अपमान नाट्य ताजे असतानाच त्यांना पुन्हा एकदा शिवसेना नेतृत्वाकडून अपमानीत व्हावे लागले आहे. पक्ष नेतृत्वावर टिका केल्यानंतर त्या बद्दल माफी मागणार नाही अशी भूमिका घेणा-या पंताना शुक्रवारी पक्ष नेतृत्वाची माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. पंतानीही अपमानीत होऊन चुपचाप माफीनामा सादर करत सपशेल शरणागती पत्करली.
मनोहर जोशी यांनी ११ ऑक्टोबरला दादरच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती. या बद्दल बोलताना चूकीचे बोललो नसून माफी मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांना थेट व्यासपीठावरून खाली उतरवून अपमानीत करण्यात आले होते. त्यानंतरही जोशी सर वेगवेगळी वक्तव्य करतच होते.
या पार्श्वभूमिवर शनिवारी शिवसेनेच्या मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्ष शिस्तीवर चर्चा झाली. या वेळी मनोहर जोशीही उपस्थित होते. जोशी यांनी केलेल्या कथीत वक्तव्या बाबत त्यांनी जाहीर माफी मागावी असे त्यांना सुचवण्यात आले. सुरवातीला त्या बाबत जोशी तयार नव्हते. त्यांनी बैठकीत माफी मागण्याची तयारी दर्शवली. मात्र टीका ही जाहीरपणे केली असल्याने माफीही जाहीर पणे मागावी असे सांगण्यात आले. सर्व बाजूने कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतानी इच्छा नसताना माफी मागण्याची तयारी दर्शवली.
दरम्यान ज्यांना माझा नेतृत्तावर विश्वास नाही त्यांनी सरळ पक्षातून बाहेर पडावे. त्यांना आपण रोखणार नाही. त्यांचा मार्ग त्यांना मोकळा आहे. असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी माफीनामा सादर होण्या आधी केले. त्यानंतर काही वेळात जोशी यांनी माफीनामा सादर केला. त्यामुळे शिवसेनेच्या या जेष्ठ नेत्यालाच पक्षाने दोन वेळा अपमानीत करत त्यांची जागा दाखवल्याची चर्चा आहे.
पंतांचा माफीनामा
माननीय पक्षप्रमुखांचा अवमान होईल असे कोणतेही विधान माझाकडून अनवधनाने जरी झाले असले तरी पक्षशिस्त म्हणून झाल्या प्रकाराबद्दल मी जाहीर दिलगीरी वक्त करतो.
Narayan rav tumhi hi माफीनामा magun senet pravesh kara.
KHARACH KARA TUMCHI SHIVSENELA GARAJ AHE..