Friday, May 3, 2024
Google search engine
Homeटॉप स्टोरीमाझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!

माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!

लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या विकासाच्या मॉडेलचा, कोकणाच्या परिवर्तनाच्या विचाराचा ऊहापोह हे या लेखाचे प्रयोजन आहे.

narayan raneदेशात सत्ता परिवर्तन होऊन भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमताचे सरकार आल्याबद्दल भाजपचे मी अभिनंदन करतो.

माझ्या आजवरच्या जीवनामध्ये मी लोकसभेच्या व विधानसभेच्या अनेक निवडणुका पाहिल्या व अनुभवल्या. या सर्व निवडणुकांचे निकाल व लोकांनी दिलेले कौल अतिशय चांगल्या प्रकारे माझ्या लक्षात आहेत. १६ मे रोजी देशाच्या सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आला. इतर मतदारसंघांबरोबर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही निकाल जाहीर झाला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात आणि देशात काँग्रेस पक्षाचा पराभव होण्यामागे जी कारणे आहेत, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती कोकणात असेल, कोकण त्याला अपवाद असेल असा विश्वास मला वाटत होता. दुसरे म्हणजे उत्तरेकडून कोणत्याही विषयाच्या लाटा आल्या तरी त्या परतविण्याचे सामर्थ्य महाराष्ट्राने आजवर दाखविले होते. निवडणुकीच्या निमित्ताने कोणतेही मॉडेल आकर्षक करून दाखविले तरी वस्तुस्थिती जनतेच्या लक्षात येईल असाही माझा विश्वास होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या विकासाच्या मॉडेलचा, कोकणाच्या परिवर्तनाच्या विचाराचा ऊहापोह हे या लेखाचे प्रयोजन आहे.

गेली २५ वर्षे मी कोकणाचा लोकप्रतिनिधी या नात्याने काम करीत आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक प्रगती व शिक्षण क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या कोकण विभागाला महाराष्ट्राच्या प्रगत जिल्ह्याच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न मी या काळात केला. हा प्रयत्न करीत असताना मी दिवसरात्र मेहनत केली. ज्या महिन्यात मी कोकणात दोन-तीन वेळा आलो नाही, वाडय़ा आणि गावे चाळून झाली नाहीत, लोकांना भेटलो नाही असा गेल्या पंचवीस वर्षातील एकही महिना नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ चे चौपदरीकरण, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्याला इंग्रजी शाळा, आयटीआय, मालवणला पॉलिटेक्निक, डेअरी, कृषी, हॉर्टिकल्चर, इंजिनीयिरग आणि आता मेडिकल कॉलेज ही सर्व शैक्षणिक प्रगती राज्यातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिकच आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण (दहावीचे निकाल ८७ टक्के आणि बारावीचे निकाल ८५ टक्के), बेकारी दूर करण्यासाठी पर्यटन विकास, सी-वर्ल्ड, चिपी-परुळे विमानतळ, रेडी बंदर विकास, कासार्डे व दोडामार्ग येथील एमआयडीसी हे सर्व प्रयत्न सिंधुदुर्गाची व कोकणाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी केले. आरोग्यासाठी सुमारे ७०० खाटांची व्यवस्था असलेली हॉस्पिटल्स व ट्रॉमा सेंटरसह विविध सुविधा जिल्ह्यात उपलब्ध केल्या व करीत आहे. विकासाचे एक उत्तम मॉडेल असा सिंधुदुर्ग जिल्हा मी महाराष्ट्रासमोर ठेवला.

nilamtai raneजनतेच्या सुखदु:खांशी समरस होऊन जनतेला मदत करणे ही चूक आहे काय? – सौ. निलम राणे

जिल्ह्यातील महिला आर्थिकदृष्टय़ा सबळ व्हाव्यात, सक्षम व्हाव्यात यासाठी बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळया उद्योगांसाठी प्रक्रिया व मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याकरिता ओसरगाव येथे ७ एकरांवर जिजाई महिला बचत भवन प्रकल्प आम्ही उभारला. हा प्रकल्प उभा करण्यासाठी माझ्या पत्नीने दिवसरात्र मेहनत घेऊन फार मोठे योगदान दिले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये खासदार या नात्याने डॉ. निलेश राणे याने पाच वर्षे दिवसरात्र काम केले. महिन्यातील वीस दिवस तो आपल्या मतदारसंघामध्ये व्यतित करीत होता. या दोन जिल्ह्यांतील पावणेतीन हजार गावांपैकी प्रत्येक गावामध्ये किमान दोन वेळा पोहोचलेला तो एकमेव खासदार आहे, अशी मला खात्री आहे.

माझा जन्म सिंधुदुर्गामध्ये झाला. कोकणाशी माझी नाळ आणि माझ्या भावना जुळलेल्या आहेत. माझा जन्मच कोकणात झाला असल्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन मी कोकणासाठी बरेच काही केले. अनेक वेळा अनेक गोष्टी दबाव आणून मी कोकणाच्या पदरात पाडून घेतल्या. आंब्यासाठी पहिली नुकसानभरपाई, माशांच्या दुष्काळासाठी भरपाई, फयान वादळा वेळी भरघोस वाढीव मदत हे सारे मी कोकणाचा प्रतिनिधी म्हणून सरकारकडून मिळवू शकलो. मच्छीमारांच्या ट्रॉलर्सकरिता कर्ज उभारणी करताना मालमत्तेऐवजी ट्रॉलर तारण ठेवण्याची सुविधा मी मिळवून देऊ शकलो. आज कोकणाचे नाव निसर्गरम्य परिसराबरोबरच विकसित भाग म्हणून सन्मानाने देशभर घेतले जाते. मागील २५ वर्षात मी विधानसभेच्या सहा निवडणुका लढलो. याच कोकणातील जनतेने कोणताही प्रचार न करता मला प्रत्येक वेळी भरघोस मतांनी निवडून दिले.

Dr. nilesh raneखासदार म्हणून न मिरविता, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जनतेचा सेवक म्हणून जनतेच्या विकासासाठी राबलो हा गुन्हा झाला काय? – डॉ. निलेश राणे

सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मला कोणत्याही निवडणुकीमध्ये पराभव माहिती नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. निलेश राणे यांचा पराभव म्हणजे मी माझाच पराभव समजतो. गेली २५ वर्षे वेळ-काळ, दिवस-रात्र, तन-मन-धनाने मी कोकणासाठी झटलो. सत्तेचा पुरेपूर वापर कोकणासाठीच केला. अनेकांशी शत्रुत्व पत्करून स्वत:चा जीवसुद्धा धोक्यात टाकला. आज प्रश्न पडतो, मी हे सारे कोणासाठी केले? देशातला आणि राज्यातला निकाल मोदी यांच्या लाटेमुळे भाजपच्या बाजूने लागला असे जरी म्हटले, तरी मी केलेले काम, कार्य व मेहनत वाहून नेण्याएवढी ताकद मोदी लाटेमध्ये होती, असे मी मानण्यास तयार नाही. माझ्या विरोधकांना मी नकोसा झालो आहे. माझ्यावर खोटे-नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करणे एवढाच त्यांचा कार्यक्रम राहिला आहे. विरोधकांना मी सर्व सत्तास्थानांपासून दूर ठेवले असल्यामुळेच हा त्यांचा माझ्यावरचा द्वेष. कोकणातील साध्या लोकांना फसवून त्यांची दिशाभूल केली जाऊ नये यासाठीच मी त्यांना कोकणातील जनतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

गेली २५ वर्षे मी ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे कोकणाचे नाव राज्यात आणि देशात मोठे झाले. कोकणी माणसाची बुद्धिमत्ता, प्रभाव, येथील निसर्ग, पिके, बागायती यांचे मार्केटिंग मी केले. यामध्ये या सर्व विरोधकांचे काय योगदान हे त्यांनी दाखवून द्यावे. लोकांसाठी कामे करूनही पराभव पदरी पडतो, असे संकेत निवडणुकांमधून मिळत असतील तर काम करणारे लोकप्रतिनिधी राजकारणात सक्रिय होण्यासाठी पुढे येतील काय, हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.

मोदी लाटेमुळे कोकणामध्ये आमचा पराभव झाला, पण, मोदींच्या कोणत्या लाटेमुळे कोकणात समृद्धी येईल हे आता विरोधकांनी सांगणे आवश्यक आहे. कोकणाच्या या  भूमीसाठी विरोधकांचे आजपर्यंतचे योगदान काय, त्यांचे काम काय आणि त्यांची कुवत काय? या एका विजयामुळे विरोधकांनी हुरळून जाऊ नये. निवडणुकीमध्ये लोकांना दिलेली आश्वासने पाळून त्यांनी कोकणाचा विकास कसा करणार हे लोकांना आधी सांगावे.

या निवडणुकीमध्ये विरोधकांबरोबर पत्रकार, मित्रपक्ष, काही आप्त आणि पोलिस अधिका-यांची माझ्या विरोधात आघाडी झाली. त्यांना अपेक्षित होता तसा निकाल त्यांनी  लावला. माझा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. हा पराभव माझ्या जिव्हारी लागला हे सुद्धा तितकेच खरे आहे. मी मागील ४८ वर्षे राजकारणात आहे. हा पराभव जिव्हारी लागून मी संपेन असे कोणीही समजण्याचे कारण नाही. पूर्वीच्याच जिद्दीने आणि तडफेने मी पुन्हा उभा राहीन हा माझा आत्मविश्वास आहे. ज्या कोकणात माझा जन्म झाला, ज्या कोकणी माणसाने मला अनेक पदे व सन्मान मिळवून दिले, ज्या कोकणाच्या विकासाचा मी ध्यास घेतला, ते कोकण घडवत असतानाच माझ्या आयुष्यातील राजकीय निवडणुकीतील पहिल्या पराभवाची वेळ कोकणी माणसांनीच माझ्यावर आणली हे दु:ख, ही जखम, कधीही विसरता येण्यासारखी नाही. मागील २५ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणी माणसाचा नावलौकिक व वर्चस्व मी उभे केले, ते माझ्यासाठी नव्हे, तर कोकणाच्या हितासाठी आणि कोकणाच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी!

कोकणाच्या हितशत्रूंनी आपल्या हितापेक्षा कोकणाच्या हिताचा विचार केला असता, तर ही षडयंत्रे केली नसती व मोदी लाट या निसर्गरम्य कोकणात येऊ शकली नसती. कोकणाचा विकास बाहेरून येऊन कोणी करू शकणार नाहीत, त्यासाठी कोकणी माणूसच हवा हे त्रिवार सत्य आहे. कोकणाचे लोकप्रतिनिधित्व करण्याच्या माझ्या मागील २५ वर्षाच्या कालखंडात माझ्या पत्नीने व त्यानंतर डॉ. निलेश राणे व नितेश यांनी मला जिवाभावाची साथ दिली. त्यांच्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच मी कोकणाचे नाव राज्यभर व देशभर उंचावू शकलो.

nitesh raneबेरोजगारांना नोक-या, गरजवंतांना उपचारासाठी मदत करून प्राण वाचविणे, शैक्षणिक मार्गदर्शन करणे हे सारे चुकीचे आहे काय? – नितेश राणे

निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार डॉ. निलेश राणे फार मोठ्या पिछाडीवर आहेत, असे मला समजले. राज्यात सर्वत्रच काँग्रेसची पिछेहाट होत असल्याचेही मला समजले. ज्या कोकणाच्या भूमीवर आपण जिवापाड प्रेम केले, तिच्या विकासासाठी प्रयत्न केले, तेथील जनतेनेच निलेशचा पराभव केल्यामुळे व काँग्रेस पक्षाचा एक जबाबदार नेता या नात्याने राज्यात काँग्रेस पक्षाच्या झालेल्या जबरदस्त पिछेहाटीमुळे मी माझ्या मंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा दिला. या राजीनाम्याचा अर्थ काही लोकांनी फार वेगळा लावला. मला या लोकांना सांगावेसे वाटते की, नैतिकता काय असते, ती केव्हा व कशी पाळावी लागते, जबाबदारी स्वीकारण्यासाठी मनाचा मोठेपणा कसा असावा  लागतो, जनमानसातील आपली प्रतिमा कशी जोपासावी या गोष्टी मला चांगल्या कळतात. कोणावर दबाव आणण्यासाठी किंवा कोणत्या पदावर नजर ठेऊन मी राजीनामा दिलेला नाही. डॉ. निलेश राणे यांचा पराभव म्हणजे माझा पराभव असे मी मानतो व तो माझ्या जिव्हारी लागला असल्यामुळेच मी हा राजीनामा दिला आहे.

लोकशाहीमध्ये राज्यघटनेप्रमाणे मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मत देण्याचा अधिकार आहे हे मला पूर्णपणे अवगत आहे. घटनेने दिलेला हा अधिकार मी शिरसावंद्य मानतो. असे असले तरी कोकणी माणसाशी माझा असलेला जिव्हाळा आणि कोकणाशी असलेली माझी नाळ यामुळे निवडणुकीतील हा कौल मला जिव्हारी लागला. आता निवडणुका झाल्या. गेलेली वेळ कोणीही परत आणू शकत नाही. ज्या भागातील जनता सूज्ञ असते, ज्यांना बरं-वाईट कळते, तेथील लोक विकासाची धमक व कुवत असलेले व्यक्तिमत्त्व ओळखतात आणि अशाच भागात विकास दिसतो, नांदतो, जनतेला विकास अनुभवायला मिळतो असे म्हणतात. कोकणाच्या विकासासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे नारायण राणेंसारखे दुसरे नेतृत्व आज कोकणामध्ये आहे काय, याचे उत्तर षडयंत्रांमध्ये दंग असलेल्या कोकणाच्या हितशत्रूंकडे मागितले पाहिजे. लोकसभा निवडणुकीचा लोकांनी दिलेला कौल मी मान्य केला आहे. जनमताचा मी आदर करतो. त्याच वेळी कोकणी माणसांच्या बाबतीत आपली माणसे म्हणून अपेक्षा ठेवण्यात चूक झाली असल्यास ती सुद्धा चूक मी मान्य करतो. आजचा हा लेख लिहिताना माझ्या मनात कोणतेही राजकारण नाही. अंत:करणापासून जे वाटले तेच मी या लेखाच्या रूपाने समोर ठेवले.

RELATED ARTICLES

23 COMMENTS

  1. Wining and loosing its part of Game. Mr. Rane should seriously think about the people around him. The square around him, those people always miss guided to Mr. Rane. We know Mr. Rane have done a lot of things for konkan but your team Members the kind of arrogance they shows to common people, that is the root cause of lost the ground.
    Konkani People always respect you and your work, but same attitude should come to your team members as well.

    Please, suggest ur team, you are common party member and be grounded even you have position in politics. Ask them to respect public with power and without power.

    Try to fill your team with honest and good people.

    Still time is there to think and reform!!

    Wish you all the best for assembly election.

  2. Respected Sir

    Kindly do not become nervous and/or lose your hope. We are with you, we love you sir. I am not much interested in politics, but since childhood I am admiring you as an Ideal leader for Konkan Region . We too surprised by Dr. Nilesh’s result, coz we have seen you working for people and Kokan Region. You have taken lot of pain and did scarified your life, even though you never attar a word.
    I am common man. In the past whenever I unsuccessful, I took as a challenge and shown the world that I am the Best. Trust me sir you are the best. Or May there is bigger opportunity is waiting for you; could be better than this. So please come back and show the world that you are the The Best. There are many projects you need to complete or/ and introduce for Kokan region.
    All the best to you All. II Shri. Swami Samarth II
    Please forgive me if I say anything wrong.

    Best Regards
    Shailesh Lad.
    sladz@rediffmail.com

  3. राणे साहेब ……

    धीर सोडू नका तुम्ही नाहीत तर हे कोकण द्वेषी लोक माझ्या कोकणाला विकतील कोकणाला कोणी वालीच राहणार नाही …।

    राणे असे पर्यंत कोकणाकडे कोणी वाईट नजरेन बघण्याची यांची हिंम्मत होत नव्हती म्हणून कोकणाचा द्वेष करनारयानि
    त्यांचा डाव साधला … कोकणात गरीबाच्या घरी दोन वेळ काय शिजत हे यांना माहित नाही हे लोक कोकणाचा विकास काय करणार …
    कोकण समजायला कोकणात जन्म घ्यावा लागतो …… तरच कोकण समजू शकतो

    तुम्ही काल हि कोकणाचा आधारस्तंभ होता आणि आज हि आहात …. कोकणद्वेषी लोकांना हे माहित नाही कि,
    राणे सत्तेमध्ये असोत अथवा नसोत कोकणच्या रक्षणाकरता सदैव समर्थ आहे …।

    कोकणावर जीवापाड प्रेम करणारा

    एक कोकणी

  4. dada sorry kokanatil lokani swatachya payawar dagad marun ghetlay. dada vidyaman khasdaranche ( tyanchi rajkiya kala sakat) mumbaitil kam kay ahe te manda. tumchya virudha dami voting suddha zale asel . karan mumbait ase voting senechya bajune zale ahet. shoda

  5. दादा तुम्ही भावी मुख्यमंत्री आहात. श्री देव रामेश्वर आपल्या पाठीशी आहे. तुम्ही फणस आहात. मनाने प्रेमळ दादा मतदारांना कळले नाहीत हे दुर्देव !

  6. या लोकसभा निवडणुका मध्ये जे झाल ते योग्य नाही झाल. मी कोणी कॉंग्रेस चा कार्यकर्ता नाही. पण राणे कुटुंबियाचा एक कोकणी माणूस म्हणून चाहता आहे. राणे कुटुंबी यांनी कोकणासाठी किती काम केली किती काय काय केल ते बघितलं आहे अनुभवलं आहे. कोकण काय होत आणि राणे साहेबांच्या कारकिर्दीत कोकणाचा कसा विकास झाला.सध्या च्या नवीन पिढीला त्याची कदाचित जाण नसावी त्यामुळेच कदाचित हि परिस्थिती आली असेल. कोकण वासीयांच राणे कुटंबा वर खरच प्रेम आहे. कारण जेव्हा निलेश राणे साहेब पिछाडीवर आहेत हे कळल, त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाराजीच दिसत होती. मोदी लाट नक्कीच होती. पण कोकणात असा निकाल लागेल अस अजिबात वाटल नव्हत. पण कोकणी माणूस बाहेरच्या व्यक्तीच्या अपप्रचाराला बळी पडला. शेवटी आपल कोण परकं कोण याचा विचार कोकण वासियांनी करायला हवा. घरचा माणूस जेवढी आपुलकीने घरची काम करतो तेवढी बाहेरची व्यक्ती करणार नाही एवढ नक्की. थोडे दिवस काही तरी केल्याच नाटक करतील. मुख्य म्हणजे काम करण्यासाठी धमक लागते आणि ती फक्त राणे साहेबां मधेच आहे. राणे कुटुंबीय कसे खाली येतील ह्या साठीच शिवसेनेने हे सर्व सुडाच राजकारण केल. एवढ जर असत तर घोटाळ्यान मध्ये नाव असणाऱ्या दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात का नाही त्यांनी प्रचाराची फळी उभारली. खरच कोकणी माणूस अपप्रचाराला बळी पडला आणि स्वताच्या पायावर दगड मारून घेतला आणि याची जाणीव लवकरच होईल. आता तरी शहाणा होईल हि अपेक्षा. आणि शेवटी शिवसेनेला मिळालेली मत हि त्यांची नाहीत. हि सर्व मोदी लाटेची मत आहेत.

  7. sir , do not worry today misearable peoples are not understand who to help us because today curreption therefore they understand nilesh will come to help us today we should stop working never to help . poor peoples tall now we should go direct new delhi your helping BJP do not come my house and we should go away very long lience and peacefully mind now thanks
    from yours friends and movement candidate
    contect me 09822864203
    Asstt- Prof. Rode Dashrath Vaijnath Mob 09822864203
    Jawaharlal Nehru Sr college parli vaijnath
    College founder and Congress. state secratery Mr.T.P.Munde.

  8. Dear Sir, I have sent my comments on this subject yesterday to email id matpeti@prahaar.co.in . I find difficult to write in Marathi Font on this web site.

    Our blessings and support will be always to our renowned hero Sir Narayanrao Rane and his Team. My family, friends and we all will always pray for the good things to happen. Now everyone will come to know the value of you Dada. It is easy to win but it is not easy to run the government and work for the people from the heart. It is not easy to bring flow of finance and complete the work. We are damn sure you will be remembered every moment and those moment all of them will cry those who have neglected you for self interest. Edwin (Ajgaon-Sawantwadi)

  9. आदरणीय दादांना सप्रेम नमस्कार,
    आम्ही राणे आणि हाटले समर्थक,
    कोकणवासीयांनी आपल्याच कणखर नेतृत्वाला दगा देवुन स्वताच्या पायावर धोंडा पाडुन घेतला. चुक लवकरच उमजेल पण वेळ गेलेली असेल. दादा लालबाग शाखा सोडल्या पासुन आम्ही तुमचेच आहोत तुमचेच राहणार. पुन्हा भरारी घेऊ. जियेंगे तो साध में और मरेंगे तो भी साथ में.
    जय नारायण
    दिनेश गांवकर/विजय भालेकर

  10. देशाचे नेतृत्व मोदिकडे आणि महाराष्ट्र च राणे साहेबांकडे ………..
    don’t worry

    विधानसभा आपलीच राहणार …….

  11. साहेब,
    जय महाराष्ट्र,
    आपले दुख योग्य आहे .परंतु त्याची करणे शोधणे हि महत्वाचे आहे आपला पराभवास जबाबदार कोकणातील भोळी जनता नसून आपले कार्यकर्ते व पदाधिकारी आहे असे वाटते .अख्या कोकणात आपण व्यक्तिश ; पोहचू शकत नव्हता त्याचा फायदा आपल्या जवळच्या लोकांनी उचलला आम्ही दादांची माणसे आहोत असे सांगून अनेक गोष्टी केल्या .त्याचे एक उदाहरण म्हणजे कुवळे तर्फेवाडी येथे एक केरळी इसमाने वाडीतील शेतकर्यांची भातशेती खणून नेली .त्याचे पैसे मागितले म्हणून त्यांच्यावर खंडणी , दंगल , चोरी सारखे भयानक कलमा खाली गुन्हे दाखल केले .त्यांना अजून हि दर सोमवारी देवगड पोलीस स्टेशनला ४० किमी जाऊन हजेरी लावावी लागते .केरळी इसम आणि त्यांचे स्थानिक साथीदार आम्ही दादांची माणसे आहोत म्हणून शेतकऱ्यांवर दबाव आणीत आहेत ( स्थानिक शेतकरी दादा आपली माणसे नाहीत का?) याची रीतसर तक्रार केली पण फायदा नाही पोलीस पाटलान पासून सर्व म्यानेज आपला सभापती , प.स.सदस्य , जी पी सदस्य , कोणी हि शेतकऱ्यांनामदत केली नाही .साहेब , जर कधी आपणास वेळ मिळाला तर आपल्या कणकवली कार्यालयात कुवळे तर्फे वाडी विकास मंडळ lमुंबई चे पत्र दिले आहे ते वाचावे .म्हणजे कळेल कि आपले पदाधिकारी आणि कार्येकरते आपल्या पासून किती गोष्टी लपून ठेवतात ते .
    साहेब , आपली कामे आपले श्रम आपली मेहनत खूप आहे …आणि आपण मनापासून कोकनाकारीत काम केले आहे .
    धन्यवाद .जय महाराष्ट्र.

  12. राणे कुटुंबीयांनी कोकणासाठी किती काम केली, किती काय काय केल ते सर्वांना माहित आहे, अनुभवलं आहे. कोकण काय होत आणि राणे साहेबांच्या कारकिर्दीत कोकणाचा कसा विकास झाला हे सुद्धा माहित आहे. कोकण वासीयांच राणे कुटंबा वर खरच प्रेम आहे. मोदीची लाट होती, पण कोकणात असा निकाल लागेल अस अजिबात वाटल नव्हत. पण कोकणी माणूस बाहेरच्या व्यक्तीच्या अपप्रचाराला बळी पडला. शेवटी आपल कोण, परकं कोण याचा विचार कोकण वासियांनी करायला हवा होता. घरचा माणूस जेवढी आपुलकीने आपली काम करतो तेवढी बाहेरची व्यक्ती करणार नाही एवढ नक्की. थोडे दिवस काही तरी केल्याच नाटक करतील. मुख्य म्हणजे काम करण्यासाठी धमक लागते आणि ती फक्त राणे साहेबां मधेच आहे. राणे कुटुंबीय कसे खाली येतील ह्या साठीच शिवसेनेने आणि काही आपल्याच पक्षाच्या लोकांनी हे सर्व सुडाच राजकारण केल आणि कोकणी माणूस देखील त्यांच्या अपप्रचाराला बळी पडला आणि स्वताच्या पायावर दगड मारून घेतला आणि याची जाणीव लवकरच होईल. आता तरी शहाणा होईल हि अपेक्षा. कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजे कोकण, हेच समीकरण संपूर्ण कोकणात पुन्हा येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीत सिद्ध होईल. रात्र वैर्याची आहे – गाफील राहू नका.
    पुन्हा उठू, पुन्हा लढू आणि विधान सभेत चारी मुंड्या चित करू

    राणे समर्थक
    ताडदेव

  13. अजूनही विश्वास बसत नाही कि डॉक्टर निलेश राणे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.
    पराभव हिच यशाची पहिली पायरी समजून परत जोमाने कामास लागावे. जे लाटेतून निवडून गले आहेत ते बघू काय दिवे लावतात ते. मालवणी माणसाला महाराष्ट्रच्या राजकीय नकाशावर कोणी मानाचा स्थान मिळवून दिले असेल ते फक्त आणि फक्त राणे साहेबांनी. साहेब पराभव विसरून विधान सभेच्या कामाला लागावे. एक मालवणी माणूस म्हणून माझ्या सद्धीच्या कायम तुमचा पाठीशी आहेत. भविष्यात तुम्ही मुख्यमंत्री झालेले बघायचे आहे.

    माझ्या सद्धीच्या तुमच्या पर्यंत पोहोचल्याचा संदेश मिळावा.

  14. या लोकसभा निवडणुका मध्ये जे झाल ते योग्य नाही झाल. मी कोणी कॉंग्रेस चा कार्यकर्ता नाही. पण राणे कुटुंबियाचा एक कोकणी माणूस म्हणून चाहता आहेतुम्ही काल हि कोकणाचा आधारस्तंभ होता आणि आज हि आहात …. कोकणद्वेषी लोकांना हे माहित नाही कि,
    राणे सत्तेमध्ये असोत अथवा नसोत कोकणच्या रक्षणाकरता सदैव समर्थ आहे …।
    कोकणावर जीवापाड प्रेम करणारा एक कोकणी
    दादा तुम्ही भावी मुख्यमंत्री आहात. श्री देव रामेश्वर आपल्या पाठीशी आहे. तुम्ही फणस आहात. मनाने प्रेमळ दादा मतदारांना कळले नाहीत हे दुर्देव !

  15. मी एवढेच म्हणेन कि मधु दंडवते साहेबानंतर जर कोणी नेता कोकणात झाला असेल तर एकच नारायण राणे साहेब.

  16. माननीय राणे साहेब
    तुम्ही आहेत म्हणून कोकणाचा विकास होऊ शकला, तुम्ही नसला तर कोकण पोरक होईल. कोकणी माणसांनी आपल्या माणसाला दगा दिला आहे. राणे साहेब तुम्ही खचून जाणार नाही हे आम्हालाही माहीत आहे, कारण राणे साहेब म्हंटल्यावर ‘प्रहार’, राणे साहेब कोकणी माणसांनी तुमच्या विरोधात जाऊन सिद्ध केल महाराजांच्या काळात पण असे फितूर होते आणि आता हि आहे. मुंबईतला आणि संपूर्ण महाराष्ट्रआतला तुम्हाला मानणारा मोठा वर्ग तुमच्या सोबत आहे, असणार आणि राहणार.!
    जय महाराष्ट्र!
    सिद्धेश बावकर
    शिवडी-परळ

  17. दादा
    दादा तुम्ही ग्रेट आहात.
    कोकणचा प्राण आहात.
    तुमच्या दूरदर्शी विचारांनी तुम्ही संपूर्ण महारात्स्राला दाखून दिले आहे कि पडत्या काळात सुधा बी जे पी चा गड असलेला मतदार संघ तुम्ही राखला.
    कोकणातील जनतेचे तुम्हीच वाली आहात.
    असेच प्रेम करा निष्ठेने पुन्हा प्रयत्न करा.
    असे हजारो पवार आणि हजारो मोडी तुमचे काहीच वाकडे करू शकणार नाही.
    तुमची पावर सगळ्या जनतेला माहित आहे.
    फक्त हाक द्या आम्ही तुमच्या साठी प्राण द्यायला तयार आहोत.
    जनतेला सुद्धा सम्जुद्या कोण खरा आणि कोण खोटा.
    तुम्चात आम्ही आमचे शिवाजी महाराज बघतोय.
    पुन्हा उभे राहू आणि शत्रूंचा नायनाट करू.
    आणि फास्व्यांपासून आपल्या जनतेचे savrakshan करू.

    जय हिंद जय maharastra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट