कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओची विक्री केल्या प्रकरणी लता मंगेशकर यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
कोल्हापूर- जयप्रभा स्टुडिओच्या विक्री प्रकरणी कोल्हापूरातील दिवाणी न्यायालयाने गायिका लता मंगेशकर , महाराष्ट्र शासन, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असणारे जयप्रभा स्टुडिओचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याचे कोणत्याही परिस्थितीत व्यापारीकरण होऊ नये आणि तेथे फक्त चित्रपट विषयकच चित्रीकरण व्हावे या मागणीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने याचिका दाखल केली होती.
कोल्हापूरातील दिवाणी न्यायालयाने यासंदर्भाने या चौघांना येत्या तीन सप्टेंबर रोजी न्यायालयात आपले म्हणणे मांडावे असे आदेश दिले आहेत. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे जयप्रभा स्टुडिओ विक्री व्यवहारास निर्णायक शह बसणार असल्याचे चित्रपट महामंडळाचे सुभाष भुर्के यांनी सांगितले.
दरम्यान, ज्येष्ठ नेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांना सुभाष भुर्के, अर्जुन नलवडे, यशवंत भालकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापक शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन देऊन जयप्रभा स्टुडिओच्या बचावासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
Keep on writing and chuniggg away!