रशियाच्या दौ-यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे उघड झाले आहे.
मॉस्को- रशियाच्या दौ-यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रगीत सुरू असताना चालणा-या मोदींना रशियन अधिका-याने थांबवल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर भारतात खळबळ उडाली.
रशियाची राजधानी मॉस्कोच्या वनुकोवा-२ विमानतळावर उतरल्यानंतर राजशिष्टाचाराप्रमाणे मोदी यांना रशियन लष्करातर्फे मानवंदना देण्यात येत होती. त्यावेळी रशियन लष्कराचे बॅँडपथक भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ची धून वाजवत होते. तेव्हा मोदी हे न थांबताच पुढे जाताना दिसत होते.
अखेर एका रशियन अधिका-याने त्यांना इशारा करून थांबण्याची खूण केली तर दुस-या अधिका-याने त्यांना हात धरून माघारी बोलवले.
राष्ट्रगीत वाजवले जात असताना संबंधितांनी स्तब्ध राहणे आवश्यक असते. मात्र, मोदी यांनी पंतप्रधान असूनही राष्ट्रगीताच्या नियमांचे उल्लंघन केले.
मोदी यांनी राष्ट्रीय ध्वज संहितेचा अपमान केला आहे. आता रशियात त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. ही बाब धक्कादायक आहे. मोदींची राष्ट्रभक्तीची ‘इस्टाईल’ अजबच आहे, अशी टीका कॉँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केली.
अभिषेक सिंगवी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना रशियन अधिका-याने राष्ट्रगीताची जाणीव करून देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
पंतप्रधान हे भारताचे परदेशात प्रतिनिधीत्व करत असतात. देशाच्या दृष्टीने संवेदशील बाबींची नोंद पंतप्रधानांनी घेतली पाहिजे, असे माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी सांगितले.
आता तरी मान्य कराल नरेंद्र मोदी नकली आहेत. असली नरेंद्र मोदींना बंदी करून बहु राष्ट्रीय कंपन्यांनी उच्य शिक्षित असलेल्या आपल्या माणसाला नरेंद्र मोदी बनवून त्याला भारताचे पंत प्रधान बनविले आहे.आणि भारतीयांचे आर्थिक शोषण करणारे आपले उधोग मंजूर करून घेत आहेत.तर आमचे कोकणातील नेते शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळ खंडातून बाहेर पडायला तयार नाहीत. ते स्वताला भारतीय समजत नाहीत.जातीचे राजकारण करणे हेच त्यांचे काम आहे.