सध्याची युवापिढी आणि व्यसन हे एक समीकरण बनले आहे. धूम्रपान करणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतासारख्या देशात दरवर्षी एक लाख लोकांचा मृत्यू धूम्रपानामुळे होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
मुंबई – सध्याची युवापिढी आणि व्यसन हे एक समीकरण बनले आहे. धूम्रपान करणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतासारख्या देशात दरवर्षी एक लाख लोकांचा मृत्यू धूम्रपानामुळे होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. व्यसनाधीनांची संख्या वाढत गेल्यास २०२० पर्यंत प्रतिवर्षी मृत्यू पावणा-यांचा आकडा १.५ लाख असू शकतो, असे ‘इंटरनॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोजेक्ट’ने (आयटीसीपी) आपल्या अहवालात म्हटले आहे.
भारतात अनेक प्रकारचे सिगारेट्सचे ब्रँड्स आहेत. भारतात वापरल्या जाणा-या सिगारेटमधील निकोटिनचे प्रमाण परदेशातील सिगारेटपेक्षा अधिक असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. भारतीय आणि परदेशातील सिगारेटमधील निकोटिनच्या प्रमाणातील तफावत जवळपास ५-६ एमजी प्रती ग्रॅम आहे. आजच्या घडीला प्रत्येक दिवशी जवळपास ८२ हजार ते ९९ हजार तरुण धूम्रपानाच्या आहारी जात आहेत. भारतात १५ वर्षे किंवा अधिक वय असलेल्या लोकसंख्येच्या ५७ टक्के जनता तंबाखूचा वापर करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतात सध्या २७५ लाख तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या असल्याचे देखील नमूद केले आहे.
धूम्रपानातून शरीरात जाणा-या निकोटिनचे प्रमाण तंबाखू चघळण्यातून शरीरात जाणा-या निकोटीनपेक्षा चार पट जास्त असल्याचे अनेक प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. अनेक वेळा अशा लोकांकडून सिगारेट सोडण्याचा संकल्प केला जातो, मात्र निकोटिनच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला असे करणे सहज शक्य होत नाही. जवळपास ९० टक्के लोकांकडून असे संकल्प लगेचच मोडले जातात.
धूम्रपान केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यात कर्करोगाचा धोका अधिक असतो. यात तोंडाचा कर्करोग आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. भारत आणि परदेशातील सिगारेट्समध्ये तफावत असल्याने कर्करोग रुग्णांची संख्या तुलनेने भारतात जास्त आहे. तंबाखूचे सेवन सिगारेटमार्फत असेच होत गेल्यास २०३० पर्यंत ८ लाख लोक मृत्युमुखी पडतील, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.
धूम्रपान टाळणे सहजशक्य नसले तरी त्याबाबत योग्य जनजागृती करता येऊ शकते. सिगारेटच्या पाकिटावर धूम्रपान करणे आरोग्यास हानीकारक आहे, असा संदेश दिलेला असतो. मात्र तरीदेखील सिगारेटचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. या संदेशाबरोबरच सिगारेटच्या पाकिटावर निकोटीनच्या प्रमाणाचा उल्लेख केलेला असावा.
आज कोणत्याही क्षेत्रात काम करताना दडपण हे असतेच. याच दडपणाचा सामना करताना डोके थंड राहावे, यासाठी ‘किक’ म्हणून ड्रग्ज आणि सिगारेटचा वापर केला जातो. सिगारेटमुळे थोडय़ा वेळापुरता स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळतो. आरोग्याला धोका आहे, हे मान्य; पण आता याची सवयच झाली आहे.- ज्वेलरी कर्मचारी
maraa maraa azun maraa. Ashi vyasana vaadhlyani gudmarat mele paahijet Saale. Cigaratte cha aaicha gho aani naanachi taang. Mumbai Khadyar zaayla lagliye. Mumbit ciggarete pinaryanna phashich dya.
Very truly said !!