भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होण्यासाठी विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला केवळ आणखी एक विजय आवश्यक आहे.
नवी दिल्ली– भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होण्यासाठी विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला केवळ आणखी एक विजय आवश्यक आहे. शनिवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या विजयासह ढोणीने एकदिवसीय क्रिकेटमधील माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन याच्या ९० विजयाशी बरोबरी साधली आहे.
अझरुद्दीन १९९० ते १९९९ ही नऊ वर्षे भारताचा कर्णधार होता. या काळात त्याने १७४ सामन्यात भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ९० सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे ढोणीने हा टप्पा केवळ सात वर्षाच्या कालावधीमध्ये आणि १६१ सामन्यात पार केला आहे. इतक नव्हे तर ढोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १०० विजयाच्या जवळ पोहचला आहे. जर ढोणीने या विक्रमाला गवसणी घातली तर १०० एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून देणारा तो पहिला कर्णधार ठरेल.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा दारुन पराभव झाला असला होता. मात्र इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये ढोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. ढोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध २४पैकी १६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर केवळ पाच सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले आणि एकाचा निकाल लागला नाही. इंग्लंडविरुद्ध ढोणीची विजयाची सरासरी ७३.९१ इतकी आहे.
इंग्लंडविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात ढोणीने आणखी एक विक्रम केला आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने १३१ जणांना बाद केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील हा नवा विक्रम ठरला आहे. याआधीचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने १२९ जणांना बाद केले आहे. विशेष म्हणजे संगकाराने यासाठी ५६३ सामने खेळले आहेत. तर ढोणीने केवळ ३८१ सामन्यांमधून हा विक्रम केला आहे.
ढोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवे विक्रम जरी केले असले तरी पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया होणा-या विश्वचषकाचे आव्हान ढोणीपुढे आहे. कसोटी सामन्यात १-३ने पराभव स्वीकारल्यानंतर ढोणीच्या नेतृत्वावर जोरदार टिका झाली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. याच सातत्याने भारतीय संघाला यापुढेही खेळ करावा लागणार आहे.
Canllig all cars, calling all cars, we’re ready to make a deal.