राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला महाराष्ट्राचा खेळाडू मयूरेश पवार याचा सोमवारी बुडून मृत्यू झाला.
तिरुअनंतपूरम – राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला महाराष्ट्राचा खेळाडू मयूरेश पवार याचा सोमवारी बुडून मृत्यू झाला. षण्मुगम येथील समुद्र किना-यावर फोटो घेत असताना ही घटना घडली.
त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. सकाळी चंदिगडविरुद्धचा सामना झाल्यानंतर मयूरेश पवार हा षण्मुगम किना-यावर गेला. तो फोटो काढत असताना समुद्रात खेचला गेला.
त्याला तातडीने अनंतपुरी रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. मयूरेशचे पार्थिव मंगळवारी सकाळी विमानाने आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे पार्थिव सातारा जिल्ह्यातील जन्मगावी नेण्यात येणार आहे, असे अधिका-यांनी सांगितले.
दुर्दैवी मयुरेश !!!! “parmeshwar त्याचे आत्म्यास सद्गती देओ ” त्याचे कुटुंबियांचे दुख्हात आम्ही सहभागी आहोत .
अत्यंत क्लेशदायी बातमी.इतक्या लहान वयात पण हृदय विकार होऊ शकतो हे सगळ्यांनी ध्यानात ठेवून आपली दिनचर्या त्यानुसार ठेऊन वेळोवेळी वैध्याकीय तपासण्या करून घ्य्वायास हव्या.महाराष्ट्राच्या सर्व जनता,नेते,सरकार ह्यांनी दुर्दैवी मातापित्यांना दुख सहन करण्यास धीर ध्यावा व मायुरेश्चे पार्थिव सन्मानपूर्वक व त्वरित महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करावी.