महाराष्ट्रासह पश्चिम व मध्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केली.
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह पश्चिम व मध्य भारतातील सर्व राज्यांमध्ये येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केली.
सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर विविध राज्यातून पाऊस हळूहळू काढता पाय घेतो. मात्र यंदा याच महिन्यात पावसाने सर्वत्र थैमान घातल्याचे दिसत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य व पश्चिम भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र, कोकण, मध्य प्रदेश, गुजरात, अंदमान-निकोबार, पूर्व राजस्थान, गोवा आदी राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे.
हवामान खात आधीच पचकल कि पाऊस अपोआप गायब होतो…