करिना कपूरच्या आगामी चित्रपटात तिच्यासोबत तिचा मुलगा तैमूरही या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
मुंबई- बॉलिवूडची बेबो करिना कपूर तैमुरच्या जन्मानंतर पुन्हा चित्रपटसृष्टीत कधी येणार याची तिचे चाहते वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
करिना सध्या सोनम कपूर आणि स्वरा भास्करसोबत ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. पण खास गोष्ट तर ही आहे की, या चित्रपटात तिच्यासोबत तिचा मुलगा म्हणजेच तैमूरसुद्धा चाहत्यांना पाहयला मिळणार आहे.
करिनाने हा चित्रपट साइन केला तेव्हा ती गरोदर नव्हती. पण चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार होते तेव्हा करिनाला कळले की ती गरोदर आहे. तेव्हा तिने या चित्रपटाच्या निर्मात्यांना दोन पर्याय दिले.
ती हा चित्रपट सोडेल किंवा मग त्यांनी तिच्या बाळंतपणापर्यंत वाट पाहावी. निर्मात्यांना या चित्रपटात करिनाच हवी होती. मग तिस-या पर्यायावर विचार झाला. चित्रपटाच्या पटकथेत थोडा बदल करत तिच्या गर्भारपणाचाही तिच्या भूमिकेत समावेश करण्यात आला.
आता काही सूत्रांकडून असं कळलंय की ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात प्रेक्षकांना तैमूरचीही झलक दिसणार आहे. चित्रपटाची टीम यासाठी पटकथेवर काम करत आहे. तैमूर याआधीच स्टार झाला पण आता या चित्रपटातही तो एका स्टारसारखाच दिसणार आहे.
दिसलो काय लगेच पदमभुषण देवा तेका . नाय तरी मागे तेच्या बापाशीक असोच फुकट दिल्लो .