प्रदर्शित होण्याआधीच ‘बाहुबली’ या बहुभाषीय चित्रपटाने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हैदराबाद – प्रदर्शित होण्याआधीच ‘बाहुबली’ या बहुभाषीय चित्रपटाने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र त्यापूर्वीच या चित्रपटाला फेसबुक, ट्विटर या सोशल साईटवरुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाने फेसबुकवर आतापर्यंत १३ लाखाहून अधिक लाईक्स आणि ट्विटरवर ४० लाखाहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. तसेच या चित्रपाच्या तिकीटासाठी लोकांनी बुकिंग कऱण्यासही सुरुवात केली आहे.
हैदराबादमधील अनेक चित्रपटगृहांच्या तिकीटखिडकीबाहेर प्रीबुकिंगसाठी मोठमोठ्या रांगा दिसत आहेत. या चित्रपटाने फेसबुकवर १३ लाख १५ हजार ६३९ लाईक्स मिळाले आहेत. २०० कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट उद्या चार हजाराहून अधिक चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.
एस.एस.राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रभास, राणा दग्गुबत्ती, तमन्ना, अनुष्का शेट्टी. सत्यराज, रमया कृष्णन, अदिवी शेष, नस्सार, प्रभाकर यांनी काम केले आहे.
Bahubali is greatest movie