महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई- माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने सोमवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉ. रोहन सिक्वेरा यांनी दिली. रुग्णालयातून भुजबळांना थेट आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले.
डिस्चार्ज देण्यापूर्वी दाताच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी दंतचिकित्सा विभागात नेण्यात आले होते. मात्र उपचारासाठी पुन्हा येईल, असे म्हणत दातावर उपचार करण्यास भुजबळांनी डॉक्टरांना स्पष्ट नकार दिल्याची माहिती दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी दिली.
दातदुखी आणि छातीत दुखू लागल्यामुळे १८ एप्रिल रोजी भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांचा रक्तदाब १८०-१२० इतका होता. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला तरी दातांचे उपचार पूर्ण झालेले नाहीत. सोमवारी भुजबळ यांच्या दातांचा ‘एक्स-रे’ काढला जाणार होता. मात्र त्यांनी नकार दिल्याने उपचाराविनाच भुजबळांची तुरुंगात रवानगी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
याशिवाय भुजबळ यांचे सिटीस्कॅन व सोनोग्राफी करण्यात आली होती. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून भुजबळ यांच्या उजव्या मूत्रपिंडाचा त्रास आहे. यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांचा अन्य वैद्यकीय चाचणी अहवाल साधारण आहे. हृदयाचे ठोकेही ठीक असल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. मात्र अजूनही भुजबळ यांना अशक्तपणा असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
करणी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ तसेच मुलगा पंकज भुजबळ यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) त्यांची चौकशी सुरु आहे.
जाने कहा गये ओ दिन !
चिंता कसली करता साहेब ? तुमच्या पुढच्या सात पिढ्या एकदम सुखांत राहतील साहेब ,,!!!