मॅगी हानीकारक नसल्याचा निर्वाळा देऊनही राज्यात मॅगीवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरा मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई – महाराष्ट्रात मॅगीच्या नमुने तपासणीत शिसे निर्धारित प्रमाणापेक्षा कमी आढळून आल्याने राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मॅगी हानीकारक नसल्याचा निर्वाळा देऊनही राज्यात मॅगीवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरा मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई, ठाणे आणि सांगली येथून मागवलेल्या मॅगीच्या नऊ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या सर्व नमुन्यांमध्ये शिसेचे प्रमाण ०.०४ ते १.४८ पीपीएम पर्यंत आढळले. शिसेचे निर्धारित प्रमाण २.५ पीपीएम असणे गरजेचे असते.
गेल्या काही दिवसांपासून मॅगीच्या गुणवत्तेवरुन देशभरात वाद सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयोगशाळेत मॅगीच्या तपासणीत शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यानंतर सर्वच राज्यांमध्ये मॅगीची तपासणी सुरु करण्यात आली.
आतापर्यंत गुजरात, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, दिल्ली, तामिळनाडू या राज्यांत मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी देशभरातील सर्व दुकानांतून मॅगीचा साठा परत घेण्याचा निर्णय नेस्ले इंडिया कंपनीने घेतला आहे.
सर्व राज्यामध्ये म्यागी नापास होत असताना महाराष्ट्रात कशी काय पास झाली . दाल मी कुछ काल तो नाही