६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही या पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली.
नवी दिल्ली – ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा मंगळवारी झाली. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही या पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली. मराठी चित्रपट ‘कोर्ट’ला सुवर्णकमळाचा बहुमान मिळाला आहे तर ‘किल्ला’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हिंदीमध्ये ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मेरी कोम’ या चित्रपटाला लोकप्रिय पुरस्कार जाहीर करण्यात आला.
तीन मे रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जाणार आहे.
जाहीर झालेले पुरस्कार
»सर्वोत्कृष्ट चित्रपट – कोर्ट
»सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – क्वीन
»सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – किल्ला
»सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत(क्वीन)
»सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुरजित मुखर्जी (चोतोष्कुन बंगाली चित्रपट)
»सर्वोत्कृष्ट अभिनेता – विजय(नंदू अवनल्ला अवलू कन्नड चित्रपट)
»लोकप्रिय चित्रपट – मेरी कोम
»विशेष उल्लेखनीय चित्रपट – किल्ला(मराठी)
»सर्वोत्कृष्ट संगीतकार – विशाल भारद्वाज(हैदर)
»सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – एलिझाबेथ एकादशी
»सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – मित्रा(रवी जाधव)
»सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – बलजिंदर कौर(पगडी हरयाणवी चित्रपट)
»सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – सुखविंदर सिंग(हैदर)
»सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सैवम(तामिळ) आणि उत्तरा उन्निकृष्णन
»सर्वोत्कृष्ट वेशभूषा – डॉली आहलुवालिया(हैदर)
»सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – हैदर
»सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनक पार्श्वगायन – नाईंटीन एटी थ्री(मल्याळम)
»सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – सुदेश बिसमिल(हैदर)
मराठी फिल्म मोठी झाली असे वाटू लागले आहे