जियाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी आता तिला न्याय मिळण्यासाठी फेसबुकवर पेज तयार करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. जियाच्या आत्महत्येनंतर तिला काम मिळत नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलाशी सुरु असलेल्या प्रेम संबंधांचे कारण सांगितले जाऊ लागले. सूरज पांचोलीसोबत असलेल्या लिव्ह इन रिलेशनशीपमधून आलेला तणाव यामुळेच जियाने आत्महत्या केल्याचा दावा केला जाऊ लागला.
जियाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी आता तिला न्याय मिळण्यासाठी फेसबुकवर पेज तयार करण्यात आले आहे. फेसबुकवर जस्टीस फॉर जिया खान नावाचे पेज तयार केले आहे. (www.facebook.com/Justice.For.Jiah.Khan) विशेष म्हणजे या पेजला बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी पाठिंबा दिला आहे. या पेजवर जिया खानच्या आत्महत्येसंदर्भात माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणा-या बातम्या देण्यात आल्या आहेत. तसेच फेसबुक युझर्सना आपले मत मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिया खानची आत्महत्या ही एक धक्कादायक घटना आहे. जिया कणखर होती. तुम्ही या पेजला लाईक करुन तुम्ही आपली मते व्यक्त करु शकता, अशी माहिती या पेजवर देण्यात आली आहे.
या पेजवर जिया खानच्या आत्महत्येसंदर्भात येणा-या बातम्यांवरील लोकांच्या प्रतिक्रिया पाहता येतील.
[EPSB]
दु:खाचे कारण की..
दु:ख अनावर झाल्याचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्या दु:खाची परिस्थिती माणसांगणिक बदलत असते. प्रत्येकाला तो क्षण दु:खाचा डोंगरच वाटत असतो. त्यातून सावरला तो जगला आणि ज्याला हा दु:खावेग आवरता आला नाही तो हरला. त्या हरण्यामुळे कुणाला हृदयविकाराचा धक्का बसतो. कुणी आत्महत्या करतो.. शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. विद्यार्थी अपयश आले म्हणून आयुष्य संपवतात. तरुणाईचा […]
बंधनातून मुक्ती, लिव्ह-इन-रिलेशनशीप
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर झटपट मिळणा-या मोठया पगाराच्या नोकरीमुळे, आजची तरुणाई आर्थिक अंगाने स्वतंत्र झाली आहे. आर्थिक स्वातंत्र्याबरोबर आजच्या पिढीला रिलेशनशीपमध्येही स्वातंत्र्य हवे आहे. प्रेमासारख्या सुंदर नात्यामध्ये त्यांना आयुष्यभराची एकनिष्ठता (कमीटमेंट) नको आहे. प्रेमामध्ये त्यांना ठराविक एक वेळ, काळापुरती कमीटेड रहायचे आहे.
[/EPSB]
खरी वस्तुस्थिती –पहिल्याच सिनेमात बिग बींसमोर दमदार काम केल्यानं जिया चांगलाच भाव खाऊन गेली होती. या सिनेमासाठी तिला ‘ फिल्मफेअर ‘ चं नामांकनही मिळालं होतं जियाने अमिताभ, आमीर खान यासारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केल्यानं तिच्या आशा उचावल्या होत्या. तिला मोठं काम मिळवण्याची तिची इच्छा होती. म्हणून गेल्या तिन वर्षापासून ती धडपड करत होती. मात्र तिला कोणतंही मोठं काम मिळालं नाही म्हणून ती नाराज होती, असे जिच्या आईने सांगितले. नुकतीच जिया हैदराबादमध्ये एक ऑडिशन देऊन आली होती, मात्र तिथेही तिची निवड झाली नाही. एक्सबॉयफ्रेंड उदयपूरचे युवराज लक्ष्यराजसिंह यांचाही अलिकडेच दुस-या मुलीशी साखरपुडा झाला. मागील तीन वर्षात एकही नवी ऑफर न मिळाल्याने जिया मानसिकदृष्या खचली होती. तिच्यात एकाकीपणाची भावना वाढत होती. त्यामुळेच दर तासाला बॉयफ्रेंड सूरजशी बोलण्याची तिची इच्छा होती या सर्व घटनांमुळे निराश झालेल्या जियाने जुहू येथे सागर संगीत बिल्डिंगमधील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त.
शेवटी खापर कोणावर फोडायचं –पुरूषच-तो काही बोलूच शकत नाही -या प्रसंगी तर नाहीच नाही-मग उठवा फायदा -१०/१०-मित्र ठेवायचे आणि प्रत्येकाकडून हव्या त्या अपेक्षा ठेवायच्या
जिया मेल्यावर आता बोंबाबोंब… पैसे आणि सहानुभूती उपटण्यासाठी पोरीने गर्भपात करून आल्यावरही झोपली होती का तिची आई? ? या जातीच्या हाय सोसायटीतील आयांना आधी शिक्षा केली पाहिजे तर त्यांची उनाड पोरे सुधारतील आणि आमच्या मुलांच्या कानावर अशा प्रकारच्या बातम्या येणार नाहीत . तिच्याबरोबर त्या सुरज च्या बापालाही याच कारणावरून आत टाकायला हवे…. हो पण एकाच कोठडीत नको नाहीतर तिथे हि हे या वयात गोंधळ घालायचे !!!