रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे जिल्ह्याचे पालक म्हणून माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. नारायणराव राणे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबई- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे जिल्ह्याचे पालक म्हणून माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. नारायणराव राणे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. अशोक चव्हाण यांनी एका विशेष पत्राने अशी नियुक्ती केल्याचे श्री. नारायणराव राणे यांना कळवले आहे.
जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम अशा विविध पालकांवर सोपवण्यात आले आहे.
श्री. नारायणराव राणे यांच्यावर सोपवलेल्या जिल्ह्यांमधील सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये वारंवार दौरे आयोजित करून पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
श्री. नारायणराव राणे यांच्या या नियुक्तीने तिन्ही जिल्ह्याला एक जोरदार नेता मिळाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
जोर असलेला neta
एकच वाघ माझा नेता
अभिनंदन साहेब