कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण व दिवाणखवटी या दोन रेल्वे स्थानकानजीक दोन प्रवाशांचा २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना मंगळवार २२ जुलै रोजी घडली.
खेड – कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण व दिवाणखवटी या दोन रेल्वे स्थानकानजीक दोन प्रवाशांचा २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना मंगळवार २२ जुलै रोजी घडली असल्याची फिर्याद खेड पोलिस ठाण्यात २९ जुलै रोजी चिपळूण रेल्वे स्थानकाच्या रेल्वे सुरक्षा दलाचे शिपाई दीपक मनोहर पवार यांनी दाखल केली आहे. ही घटना २२ जुलै रोजी सकाळच्या दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव येथे जाणा-या कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीमध्ये घडली.
या रेल्वे गाडीमधून डोंबिवली पूर्व येथे राहणा-या रजनी श्रीकांत परचुरे यांनी आपली चोरी झाल्याचे रेल्वे तिकीट तपासणीस सुधाकर देवदिघे यांच्याकडे आपली तक्रार सांगितली असता त्यांच्याकडील मोबाइल व ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे समजले.
दिवाणखवटी रेल्वे स्थानकानजीक सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील परपेजीत फ्रासींस फर्नाडिस यांचाही मोबाइल, ८ ग्रॅम सोन्याची चेन तर २ हजार रुपये रोख रक्कम व अन्य साहित्य असा १७ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे आढळून आले.
या दोन्ही प्रवाशांचा मिळून एकूण २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.
कोंकण रेल चोरांची आळंदी !!!!