मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहेमान लख्वीच्या कोठडीत एक महिन्याची वाढ करण्याचा निर्णय इस्लामाबाद उच्च न्यायालयाने घेतला आहे.
इस्लामाबाद- मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहेमान लख्वी याच्या कोठडीत एक महिन्याची वाढ करण्याचा निर्णय सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने घेतला आहे.
लख्वीला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भारतात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. लख्वीबाबत पाकिस्तान सरकारने घेतलेल्या मवाळ भूमिकेबाबत भारताने पाकिस्तानला चांगलेच खडसावले होते. भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर लख्वीला अपहरण प्रकरणी ताब्यात घेतले होते.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १९९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.
ओबामा परत गेले आणि ज्होन खेरी पाकिस्तानातून परत गेले कि याला सोडणार