जीवाची बाजी लावत पाचशे मीटर अंतर धावत जाऊन ७५ कि. मी. वेगाने धावणारी कोकणकन्या एक्प्रेस थांबवून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवणा-या ट्रॅकमन सचिन पाडावेला कोकण रेल्वेने बक्षिस जाहीर केले आहे.
रत्नागिरी– कोकण रेल्वे मार्गावर करबुडे बोगद्यानजीक रेल्वेचा रूळ तुटल्याचे आढळून आल्यानंतर जीवाची बाजी लावत पाचशे मीटर अंतर धावत जाऊन ७५ कि. मी. वेगाने धावणारी कोकणकन्या एक्प्रेस थांबवून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवणा-या ट्रॅकमन सचिन पाडावेला कोकण रेल्वेने बक्षिस जाहीर केले आहे. सचिनच्या बहाद्दुरीबद्दल कोकण रेल्वेने उदारता दाखवत त्याला अवघे तीनशे रुपयांचे बक्षीस जाहीर करत त्याच्या बहाद्दुरीचे मोलच ठरवले. त्याचसोबत मिडियाशी संपर्क साधल्याबद्दल त्याला त्याच शब्दात समजही देण्यात आली आहे.
ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला
रविवारी ९ नोव्हेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे ते उक्षी दरम्यान गस्त घालणा-या ट्रॅकमन सचिन व त्याचा सहकारी सुजीत सावंत यांच्या तत्परतेमुळे कोकण रेल्वे मोठया अपघातापासून बचावली. करबुडे बोगद्यानजीक लाजूळ येथील पुलानजीक रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचे या दोघांच्या निदर्शनास आले. सचिनने या घटनेची खबर तत्काळ रेल्वेच्या कंट्रोल रूम आणि उक्षी रेल्वे स्टेशनला दिली.
दरम्यान, ट्रॅक तुटल्याने अपघात टाळण्यासाठी रूळ तुटलेल्या ठिकाणापासून तब्बल ५०० मीटर धावत जाऊन सचिनने बॅटरीने सिग्नल देत कोकनकन्या एक्प्रेसला थांबवले. ट्रॅकमन सचिनने प्रसंगावधान राखत कोकणकन्या एक्स्प्रेसला थांबवलं नसत तर मोठा अपघात कोकण रेल्वे मार्गावर झाला असता. सचिनने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक राहीले दूरच मात्र, ही बातमी मिडीयापर्यंत पोहोचली म्हणून सचिनलाच कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी धारेवर धरल्याचे समजते. या जिगरबाज कर्मचा-याच्या धाडसाचे मोलही कोकण रेल्वे प्रशासनाने केवळ तीनशे रूपये ठरवले आहे.
अरे बाबा सचिन ,हे ३००, रुपये त्या साहेबांच्या तोंडावर फेकून त्याला म्हणावं ह्याची दारू पी ,!! जय maharashtra!