दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीमधून मेहर रामपाल रडवेल्या चेह-याने बाहेर पडल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीमधून मेहर रामपाल रडवेल्या चेह-याने बाहेर पडल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. या पार्टीमध्ये अर्जून आणि मेहरमध्ये भांडण झाल्यानंतर मेहर रडत रडत तडक त्या पार्टीमधून निघून गेली असे या वृत्तात म्हटले आहे.
सुझान खानही या पार्टीला उपस्थित होती. वृत्तानुसार बाहेर निघताना मेहरच्या डोळयात अश्रू होते. आपले अश्रू कोणाला दिसू नयेत म्हणून तिने चेहरा झाकून घेतला होता आणि त्याचवेळी ती मोबाईलवरुन कोणाबरोबर तरी बोलत होती.
मेहर निघून गेल्यानंतर काहीवेळाने अर्जून आणि त्यानंतर थोडयावेळातच सुझानही पार्टीमधून निघून गेली. हृतिक रोशन आणि सुझानने घटफोस्टासाठी अर्ज दाखल केल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. या घटस्फोटाला नेमके काय कारण आहे यावर अद्यापही हृतिक आणि सुझानने गुप्तता बाळगली आहे.
आम्ही दोघेही परस्परांचा आदर करतो असे दोघांनी म्हटले आहे. मात्र सुझान आणि अर्जूनमधील वाढती जवळीक या घटस्फोटाला कारण असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. दरम्यान पार्टीमधून बाहेर पडल्यानंतर अर्जून, मेहर आणि सुझान या तिघांना खारमधील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनर घेतानाही पाहण्यात आले.
क्या पता है ! कही इधरका “माल “उधर हुवा होगा ????