‘कबड्डी वर्ल्डकप २०१६’ लवकरच सुरू होणार असून त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी क्रिकेटपटू कपिल देव पत्रकारावर भडकले.
मुंबई- ‘कबड्डी वर्ल्डकप २०१६’ लवकरच सुरू होणार असून त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी क्रिकेटपटू कपिल देव पत्रकारावर भडकले.
‘कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाचा समावेश का नाही’ असा प्रश्न एका पत्रकाराने कपिल देव यांना विचारला. त्यामुळे त्यांच्या रागाचा पारा चढला.
‘तुम्ही भारतीय नाही का’ असा उलट सवाल करत ‘जर तुम्ही भारतीय असाल तर असा प्रश्न विचारताच कामा नये. ही काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे का?’ अशा शब्दांत पत्रकाराला झापले.
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासीय संतापले असून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. असे असतानाच एका पत्रकाराने पाकिस्तानी खेळाडूंचा प्रश्न उपस्थित करताच कपिल देव संतापले.
भारतीय कबड्डी संघांची घोषणा आणि जर्सीच्या अनावरणासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
कपिल देव हे एक महान खेळाडू आहेत
आपल्या सौरक्षण mantri manohar parrikar sahebana जाऊन sanga ki govachya mandovit जाऊन maase mara.!