राजीव पाटील यांच्या निधनाची बातमी आल्याबरोबर मकाऊमध्ये मिक्ता पुरस्कारांसाठी जमलेल्या मराठी कलाकारांच्या मांदियाळीला तीव्र धक्काच बसला.
मकाऊ –राजीव पाटील यांच्या निधनाची बातमी आल्याबरोबर मकाऊमध्ये मिक्ता पुरस्कारांसाठी जमलेल्या मराठी कलाकारांच्या मांदियाळीला तीव्र धक्काच बसला. येथील उत्साही वातावरणावर शोककळा पसरली. राजीव यांच्या ‘७२ मैल’ या चित्रपटाला यंदा मिक्ताचा एक पुरस्कारही मिळाला होता. तो आनंद साजरा करण्याआधीच त्याच्या निधनाची दु:खद बातमी यावी याबद्दल अनेकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.
दिलीप प्रभावळकर, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, संजय मोने, स्वप्नील जोशी, रवी जाधव, सिद्धार्थ जाधव, उषा जाधव, महेश मांजरेकर, सुशांत शेलार, पुष्कर श्रोत्री, संजय जाधव, हेमांगी कवी, संजय नार्वेकर यांच्यासह राजीवबरोबर काम केलेल्या सगळ्याच कलाकारांनी, राजीवचे अचानक जाणे हा फार मोठा धक्का आहे.
मराठी चित्रपटसृष्टीने एक फार मोठा महत्त्वाचा प्रयोगशील दिग्दर्शक गमावला आहे, अशी भावना व्यक्त केली. ‘जोगवा’ या त्याच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातील अभिनेते उपेंद्र लिमये यांनाही त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. चंद्रकांत कुलकर्णी यांनी कलावंतांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.
राजीवला कधीही विसरू शकणार नाही
मी खूप जवळचा मित्र गमावला आहे. नव्या दमाचा तरुण दिग्दर्शक माझ्या पहिल्या चित्रपटाला न्याय देऊ शकेल, याची खात्री असल्यानेच माझ्या ‘सनई चौघडे’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मी त्याच्यावर सोपवली होती.
– श्रेयस तळपदे, अभिनेता
हादरवणारी बातमी
दिग्दर्शक राजीव पाटील यांचा मृत्यू ही खूप हादरवणारी बातमी आहे. तरुण वयातील राजीवच्या जाण्याने सगळेच हळहळतील.
– राणी वर्मा, गायिका
मी नि:शब्दच झालोय
राजीव माझा अत्यंत जवळचा मित्र होता. मी नि:शब्दच झालोय.
– संजय पाटील, लेखक
I was so confused about what to buy, but this makes it unndbstaedarle.