अमेरिकेतील मिन्नेसोटा येथे २००५ मध्ये एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली भारतीय धर्मगुरूने दिली आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेतील मिन्नेसोटा येथे २००५ मध्ये एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली भारतीय ख्रिश्चन धर्मगुरूने दिली आहे.
१६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी रेव्ह जोसेफ पलनिवेल जेयापॉल (६०) याने गुन्हा कबूल केला आहे. सप्टेंबर २००५ मध्ये या धर्मगुरूने एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी त्याला पंधरा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. १५ जूनला त्याच्या शिक्षेवर निकाल लागणार आहे.
तिथे गुन्हा करुन जेयापॉल भारतात पळून आला होता. त्यानंतर भारतीय पोलिसांनी मार्च २०१२ मध्ये त्याला अटक केली होती. मागच्या नोव्हेंबर महिन्यात त्याला अमेरिकेकडे स्वाधीन केले होते. त्याने न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पीडित तरुणी आता २५ वर्षाची झाली असून तिने आपल्यावर जेयापॉलने लैंगिक अत्याचार केला आणि शिव्या दिल्याचे म्हटले आहे.
हे धर्मगुरु अविवाहित राहतात आणि त्रास व्हायला लागला की अत्याचार करतात.