अमेरीकेतील प्रख्यात मीडिया स्ट्रिमिंग सर्व्हिस ‘नेटफ्लिक्स’ भारतात लाँच करण्यात आली आहे
नवी दिल्ली- अमेरीकेतील प्रख्यात मीडिया स्ट्रिमिंग सर्व्हिस ‘नेटफ्लिक्स’ भारतात लाँन्च करण्यात आली आहे. या ‘नेटफ्लिक्स’ मुळे आता तुम्ही टीव्ही वरील कार्यक्रम किंवा सिनेमा आॅनलाईन पाहु शकणार आहात.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात डीवीडी रेंटल सर्व्हिस तत्त्वावर ‘नेटफ्लिक्स’ ही सुविधा सुरु करण्यात आली होती. भारतात या सुविधेचा उपयोग करण्यासाठी www.netflix.com/in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यात स्वतःचे खाते खोलावे लागेल.
ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्याच वेळी तुम्हाला त्याची फी भरावी लागेल. यासाठी तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
भारतीयांसाठी ५०० रुपये , ६५० रुपये तर ८०० रुपये या दरात प्लान उपलब्ध केले आहेत. तर पहिल्या महिन्यात ही सुविधा फुकट वापरता येणार आहे.
जर तुम्ही एचडी स्ट्रीमिंगचा उपयोग करणार असाल तर प्रत्येक तासाला ३ जीबी आणि एसडी व्हिडीओवर प्रत्येक तासाला ३०० ते ७०० एमबी डाटा खर्च होईल. ४के अल्ट्रा एचडी स्ट्रीमिंगसाठी फास्ट कनेक्शन असल्यास ७ जीबी प्रती तास डाटा खर्च होईल.
‘नेटफ्लिक्स’वर ‘मार्वल्स डेयरडेविल्स’, ‘मार्वल्स जेसिका जोन्स’, ‘नार्कोस’, ‘सेंस8′, ‘ग्रेस अँड फ्रँकी’ आणि ‘मार्को पोलो’ यासह परवाने असलेल्या टीव्ही शो आणि सिनेमांचा आनंद घेता येईल.
शिवाजी महाराज कि जय.बाबा साहेब आंबेड करांचा विजय असो. असे नारे देणाऱ्या कोकणी नेत्यांना जगात काय चालले आहे याची माहिती दिलीत पण उपयोग काय.