बलात्कार आपोआप थांबतील – अबू आझमी
मुंबई – देशात निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे कडक करण्यात आले. मात्र, त्याचाही जरब बसला नाही. सत्ताधारी भाजप आमदार आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक एखाद्या चिमुरडीवरसुद्धा बलात्कार करत आहेत. त्यांना कसलाही धाक उरला नाही. यामुळे बलात्कार करणा-यांवर तात्काळ शिक्षा फर्मावण्याचे आदेश देणा-या शरियतच्या कायद्याची देशात एक वषार्साठी अमंलबजावणी करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. शरियतचा कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे भाजपच्या आमदाराने बलात्कार करुन त्या मुलीच्या पित्याचीही हत्या केली. तर, काश्मीरमधील कठुआ येथे काही हिंदुत्ववादी मानसिकतेच्या लोकांनी एका चिमुरडीवर केलेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर आझमी यांनी आपली भूमिका मांडली.
देशात सगळीकडे बलात्कार करणा-याला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यामुळेच आपण शरियत कायद्याचा आग्रह धरत असल्याचे आझमी म्हणाले. आखाती देशात बलात्कार आणि इतर गुन्हेही होत नाहीत. बलात्कार करणा-यांना थेट फाशीची शिक्षा दिली जाते. गुन्हे करणा-यालाही मोठे शारीरिक दंड आणि त्यासाठीची शिक्षा ठोठावली जाते. याच पार्श्वभूमीवर देशात केवळ एका वर्षासाठी एक प्रयोग म्हणून शरियतच्या कायद्याची अमंलबजावणी करावी, अशी मागणी आझमी यांनी केली.
82,190 Muslim prisoners, including 59,550 undertrials, are lodged in different jails across the country (source – IndiaTODAY)
ह्यांच्यावर हा प्रयोग करून बघू , आपोआप गुन्हे कमी होतील.