भारता विरुध्द होणा-या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा तेरा सदस्यीय संघ जाहीर झाला असून, ऑस्ट्रेलियन निवड समितीने कर्णधार मायकल क्लार्कचा संघात अस्थायी समावेश केला आहे.
अॅडलेड – भारता विरुध्द होणा-या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा तेरा सदस्यीय संघ जाहीर झाला असून, ऑस्ट्रेलियन निवड समितीने कर्णधार मायकल क्लार्कचा संघात अस्थायी समावेश केला आहे.
दुखापतग्रस्त क्लार्कला संघात स्थान मिळाले असले तरी, त्याला दोन दिवसात बुधवारपर्यंत आपला फिटनेस सिध्द करावा लागणार आहे.
त्यानंतर २८-२९ नोव्हेंबरला भारता विरुध्द होणा-या दुस-या सराव सामन्यातही खेळावे लागेल अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवड समितीचे प्रमुख रॉडनी मार्श यांनी दिली. चार डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ब्रिस्बेनमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ – मायकल क्लार्क (कर्णधार), डेव्हीड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॅटसन, स्टीव्ह स्मिथ, ब्राड हॅडीन, मिचेल मार्श, रायन हॅरीस, जोश हाझलेवूड, मिचेल जॉन्सन, नाथन लयॉन, पीटर सिडल.
भारत हि मालिका जिंकेलच.