महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदान केंद्राची माहिती देणारे नवे अॅप नाशिक शहरातील एका तरुणाने तयार केले आहे
नाशिक – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदान केंद्राची माहिती देणारे नवे अॅप नाशिक शहरातील एका तरुणाने तयार केले आहे. श्रीकांत निंबाळकर या २२ वर्षीय तरुणाने हे नवे अॅप बनवले आहे. माहिती शास्त्रज्ञ श्रींकात निंबाळकर याने नुकतीच अमेरिकेतील जॉन्स होपकिन्समधून पदवी संपादन केली आहे.
गुगल प्लेस्टोर मधून मतदार यादी अॅप डाऊनलोड करता येते. ज्या मतदारांनी अखेरच्या क्षणी मतदार यादीत नाव नोंदवले आहे त्यांच्यासाठी हे अॅप फारच सहाय्यक ठरणार आहे.या अॅपच्या सहाय्याने मतदारांना राज्यातील मतदार केंद्राची माहिती सहजरित्या मिळू शकते. असे श्रीकांतने सांगितले.
जर एखाद्या मतदाराला मतदारकेंद्राचा पत्ता आणि नंबर हवा असल्यास मतदार यादी अॅपमध्ये त्याला जिल्ह्याचे नाव आणि मतदासंघाची माहिती पुरवावी लागेल त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक केल्यास त्याला हव्या असलेल्या मतदारकेंद्राची माहिती मिळेल असे तो म्हणाला. या नव्या अँपमुळे मतदारांना मतदानकेंद्राची माहिती मिळवणे सहज सोपे होणार आहे.
श्रीकांतने गेल्या आठवड्यात नाशिक विभागीय महसूल आयुक्त एकनाथ दवळे आणि नाशिक जिल्हाधीश विलास राटील यांची भेट घेऊन त्यांना या नव्या अॅपची माहिती दिली होती.
खूप छान असाच यशस्वी हो . खूप नाव कामाव .आईचा कष्टाचे चीज केलेस बाळ. मला तुझा खूप अभिमान वाटतो .
मला तुझा खूप अभिमान वाटतो .खूप चं , असाच पुढे जात रहा आई च्या कष्टाचे फल मिळाले .VERY GOOD .KEEP IT UP .WELL DONE .