पालनपूर येथील राठोड कुटुंबातील तरु णीने हिंदीत एमए आणि बी. एड. केल्यानंतर शिक्षिकेची नोकरी केली. पण नोकरीत काही मन रमत नव्हते.
पालनपूर येथील राठोड कुटुंबातील तरुणीने हिंदीत एमए आणि बी. एड. केल्यानंतर शिक्षिकेची नोकरी केली. पण नोकरीत काही मन रमत नव्हते. तिला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. तिची आजीही दुधाच्या व्यवसायात होती.
अखेर तिने हिंमत पक्की केली. नोकरीला रामराम ठोकला. दुधाचा व्यवसाय सुरू केला. आता ती महिन्याला तब्बल १.८५ लाख रु पये कमविते.
या तरुणीचे नाव मंदाकिनी राठोड असे आहे. तिने वडिलांकडून ६० हजार रु पये कर्ज घेतले. त्यानंतर पालनपूर तहसीलमधील वासण गावात जमीन भाडयाने घेतली.
तेथे गाई-म्हशींचा गोठा उभारला. आता हा या गोठयात अनेक गाई-म्हशी आहेत. यांत्रिकी पद्धतीने दूध काढले जाते. वेगवेगळया गोष्टींसाठी यंत्रांची मदत घेतली जाते. मंदाकिनीचे मासिक उत्पन्न आता तब्बल १.८५ लाख रु पयांवर गेले आहे.
मंदाकिनीला मिळाले पाच अॅवॉर्ड
मंदाकिनीचे पती नवीन राठोड माणकी गावातील विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. २०१४ मध्ये मंदाकिनीला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते गुजरात श्रेष्ठ पशुपालक कृषिरत्न अॅवॉर्ड देऊन गौरविण्यात आले होते. २०१५ मध्ये बनासकांठा जिल्हास्तरावरील महिला पुष्प अॅवॉर्ड, आणंदमध्ये डॉ. एन. एस. पटेल दूध उत्पादन अॅवॉर्ड आणि ऑल गुजरात उद्योग अॅवॉर्डने तिला सन्मानित करण्यात आले आहे.
मला दुध व्यवसाय नव्याने सुरु करायचा आहे माझ्याकडे भांडवल कमी आहे त्याकरिता मार्गदर्शन मिळावे ह विनंती .