यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसोबत विविध प्रकारच्या पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसोबत विविध प्रकारच्या पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
२०१५-१६ या शैक्षणिक वषार्साठी विविध शिक्षणक्रमांचे प्रवेश १ जूनपासून सुरू करण्यात आले आहेत. विद्यापीठाचे विविध प्रकारचे सुमारे १५४ हून अधिक शिक्षणक्रम आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात यात नवीन २१ शिक्षणक्रमांची भर पडली आहे. यातील अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यापीठातील मानव्यविद्या, सामाजिकशास्र्े, वाणिज्य व व्यवस्थापन, शिक्षणशास्र्, विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकशास्र्, निरंतर शिक्षण, आरोग्य विज्ञान, कृषिविज्ञान आदी विद्याशाखा व शैक्षणिक सेवा विभागाच्या अनेक शिक्षणक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत.
या विद्या शाखांच्या पदवी, पदविका आणि पत्रकारिता पदवी, पदविका शिक्षणक्रम, बी. ए. (मराठी, हिंदी आणि उर्दू) बी. कॉम. (मराठी आणि इंग्रजी), मानवी हक्क, ग्रंथालय व्यवस्थापन, गांधी विचार दर्शन, ग्राहक संरक्षण, सहकार व्यवस्थापन, हॉटेल व पर्यटन व्यवस्थापन, इन्शुरन्स, बँकिंग, बिझनेस मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर, मोबाईल दुरुस्ती, शिवणकाम, ब्युटिपार्लर व्यवस्थापन, प्लंबर, फिटर, वायरमन, वाहन दुरुस्ती, औद्योगिक सुरक्षा, शालेय माहिती तंत्रज्ञान, फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन, सायबर सिक्युरिटी, कृषिशास्त्र, शेतीशास्त्र आदी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध आहे.
क्रुपया माहितीपत्रक पाहिजे ते पुरविण्याची क्रुपा करावी
I want take admission in MA.