दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयातील मंगळवारी एक थरकाप घडवणारी घटना उपस्थित सगळयांनी आणि नंतर सगळया जगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली. प्राणी विश्व माहीत व्हावी, यासाठी प्राणिसंग्रहालये शहरांमध्ये उभारली गेली. वन्य पशुपक्ष्यांच्या स्वातंत्र्यावर त्यामुळे गदा येत असली तरी त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची काळजी इथे घेतली जाते. त्यासाठी योग्य ते संरक्षणकवच म्हणजे सुरक्षित निवारा, सुरक्षित भिंती, खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. मात्र, प्राणिसंग्रहालयात पिंज-यात असलेले हे प्राणी लोकांना आपल्या मनोरंजनासाठी आहेत, असे वाटते आणि त्यातून अशा प्राण्यांच्या खोडय़ा काढण्याचे काम सुरू होते. मात्र, या खोडया किंवा आगाऊपणा काही वेळा जीवघेण्या ठरतात, हे मंगळवारी दिल्लीत जीवावर बेतलेल्या थरारक नाटयाने दिसून आले. दिल्लीच्या या प्राणिसंग्रहालयात विजय नावाचा एक पांढरा पट्टेरी वाघ आहे. तो या प्राणिसंग्रहालयाचा आकर्षणाचा विषय आहे. तेव्हा त्याला जवळून बघावे असे सर्वाना वाटते. मकसूद नावाचा तरुण मुलगा हे प्राणिसंग्रहालय बघायला आला होता, तेव्हा त्यालासुद्धा या वाघाला जवळून बघण्याची उत्कंठा आवरता आली नाही. त्याला वाघाचे फोटोही काढायचे होते. तेव्हा हा तरुण पिंज-यालगत असलेल्या कठडयावर चढला आणि कठडयावरून वाकून फोटो काढू लागला. मात्र, त्याचा हा अविचार त्याच्या जीवावर बेतला. वाघाने त्याला पकडले आणि काही मिनिटांनी त्याला ठार मारले. खरे म्हणजे प्राणिसंग्रहालयामध्ये सुरक्षारक्षक असावेत आणि त्यांनी अशा अति उत्साही प्रेक्षकांना आवरले पाहिजे. पण यापैकी काहीच घडले नाही. निदान या मुलाला आपला तोल सावरता आला असता तरीही दुर्घटना टळली असती. पण त्याच्या दुर्दैवाने त्याचा तोल गेला आणि तो बरोबर वाघाच्या खंदकाच्या आत जाऊन पडला. अशाही वेळी त्याला वाचवता आले असते; पण सुरक्षारक्षक नव्हते आणि उपस्थित लोकांना त्याला कसे वाचवावे, हे कळले नाही. वाघाने त्याला एक पंजा मारला आणि वाघ त्याच्यापासून दूर जाऊन बसला. पण हा सारा प्रकार बघणा-या एका व्यक्तीने वाघाच्या अंगावर दगड फेकला. त्यामुळे वाघ चवताळला आणि त्याने आतल्या मुलाला मारून टाकले. या सगळय़ा प्रकारात बाहेरच्या लोकांचा आगाऊपणा मकसूदला नडला. त्यांनी वेळीच सुरक्षारक्षकांना बोलावले असते तर त्यांनी शिताफीने या मुलाची सुटका केली असती; परंतु अशा आणीबाणीच्या परिस्थितीत प्रसंगावधान कसे राखावे, याचे भान त्यांना राहत नाही. खरे म्हणजे सगळ्याच प्राणिसंग्रहालयांच्या पिंज-यांवर सगळ्या सूचना लिहिलेल्या असतात. त्याचे पालन करणे लोकांच्या हिताचे असते. प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांना लोक काहीही खायला देतात. प्राणिसंग्रहालय बघायला जाणा-या प्रेक्षकांनी पिंज-यांवर लावलेले नियम पाळले पाहिजेत. या बाबतीत हलगर्जीपणा केल्यास तो जीवावर कसा बेतू शकतो, याचे उदाहरण दिल्लीत बघायला मिळाले.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
खूप वाईट वाटले पण जो कोणी वाघाला दगड मारणारा होता त्याला पकडा